महाराष्ट्रात 1,499 महाविद्यालये करणार सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या बैठकीत उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित करण्याच्या 2024 ते 2029 या पंचवार्षिक बृहत आराखड्यास मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात 1,499 ठिकाणी महाविद्यालये सुरू करता येणार आहेत.1,499 colleges to start in Maharashtra; Information about Chief Minister Eknath Shinde

बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



2024 ते 2029 या पंचवार्षिक स्थळबिंदू आराखड्यामध्ये 1537 नवीन प्रस्तावित ठिकाणे होती, त्यापैकी 1,499 ठिकाणे पात्र ठरली आहेत. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या 120 पैकी 109 ठिकाणे पात्र ठरली असून या आराखड्याला आज मान्यता देण्यात आली.

2019 ते 2023 या पंचवार्षिक बृहत आराखड्यामध्ये 1,059 स्थळबिंदूंचा समावेश होता. विद्यापीठांकडून 3193 नवीन प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आले होते, त्यातील 2,819 स्थळ बिंदूंना ‘माहेड’ ने मान्यता दिली होती, गेल्या पाच वर्षात 593 नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आल्या आहेत.

बैठकीत राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी माहिती दिली. शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘नॅक’ मानांकन मिळाले आहेत, मात्र ‘कायम विनाअनुदानित’ महाविद्यालयांनी देखील ‘नॅक’ मानांकन मिळविण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे नोंदणीची कार्यवाही करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

1,499 colleges to start in Maharashtra; Information about Chief Minister Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात