आगामी काळात भारत हे जगाचे विकास इंजिन असेल यात शंका नाही, असंही मोदींनी सांगितलं.
विशेष प्रतिनिधी
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. याशिवाय ते म्हणाले की 100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारतामध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. India will soon become a 5 trillion dollar economy Modis statement at the BRICS Business Forum
मोदींनी सांगितले की, ब्रिक्स बिझनेस कौन्सिलने दहा वर्षांत आमचे आर्थिक सहकार्य वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जेव्हा 2009 मध्ये ब्रिक्सची पहिली परिषद झाली, तेव्हा जग मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर येत होते. या काळात ब्रिक्स हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आशेचा नवा किरण म्हणून उदयास आला होता.
मोदी म्हणाले, “कोविड महामारी, तणाव आणि वाद यांच्यामध्ये जग आर्थिक आव्हानांमधून जात आहे. अशा काळात ब्रिक्स देशांचीही महत्त्वाची भूमिका आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथीनंतरही भारत आज जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा देश बनणार आहे.”
Sharing my remarks at the BRICS Business Forum in Johannesburg. https://t.co/oooxofDvrv — Narendra Modi (@narendramodi) August 22, 2023
Sharing my remarks at the BRICS Business Forum in Johannesburg. https://t.co/oooxofDvrv
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2023
पीएम मोदी म्हणाले की, आम्ही आपत्ती आणि अडचणींच्या काळात आर्थिक सुधारणांच्या संधींमध्ये रुपांतरित केल्यामुळे आगामी काळात भारत हे जगाचे विकास इंजिन असेल यात शंका नाही. गेल्या काही वर्षांत आम्ही मिशन मोडमध्ये केलेल्या बदलांमुळे व्यवसाय करण्याच्या सुलभतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आम्ही लाल फिती काढून लाल गालिचा पसरवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App