प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क 40 टक्के केल्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आणि त्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून 2 लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली. केंद्र सरकार ताबडतोब नाफेड मार्फत 2 लाख मॅट्रिक टन कांदा 2410 रुपये क्विंटल दराने खरेदी करणार आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वागत केले. Thanks to the Central Government from the Chief Minister on the issue of onion procurement
मात्र शरद पवारांनी या निर्णयावर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अजितदादा शेजारी बसले असतानाच पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने हस्तक्षेप करून एवढा मोठा निर्णय घेतला. त्याचे पवारांसारख्या मोठ्या नेत्यांनी स्वागत केले पाहिजे. पवार देखील केंद्रात 10 वर्षे कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात कांदा उत्पादकांवर संकट निर्माण झाले होते. त्यावेळी ते निर्णय घेऊ शकले असते, पण तो निर्णय त्यांनी घेतला नाही. आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पवारांनी वास्तविक स्वागत केले पाहिजे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांना लगावला.
कांद्याच्या कोल्ड स्टोरेज संदर्भात देखील केंद्र सरकारला विनंती करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी तेथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला, तसेच कालच महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिल्लीला पाठवून पियुष गोयल यांना सरकारतर्फे निवेदन दिले. त्यानंतर तातडीने पावले उचलून केंद्र सरकारने 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आंदोलनापलीकडे जाऊन सरकारला सहकार्य करावे. विरोधकांनी देखील यावर राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले.
आमच्या सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई बिलकुल नाही. कारण हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. राज्य सरकारमधील प्रत्येक घटकाने प्रयत्न केले केंद्र सरकारने देखील ताबडतोब प्रतिसाद दिला त्यामुळे चांगला निर्णय झाला, असा खुलासा देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App