सुभेदार सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर . अभिनेता चिन्मय मांडलेकारांनी सांगितलं कारण

18 तारखे ऐवजी आता’ या’ दिवशी होणार सुभेदार रिलीज.


विशेष प्रतिनिधी

पुणे : श्री शिवराज अष्टका’मधील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट.दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.या चित्रपटामध्ये तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा बघायला मिळणार आहे . या चित्रपटाचा सध्या महाराष्ट्रभर सर्वत्र जोरदार प्रमोशन सुरू आहे. मध्यंतरी या चित्रपटाची संपूर्ण टीम सिंहगड किल्ल्यावर जाऊन महाराजांचं स्मरण करून आले. Subedar upcoming movie release date

सुभेदार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मूळ तारीख २५ ऑगस्ट होती. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १८ ऑगस्ट करण्यात आली होती. पण आता पुन्हा तांत्रिक अडचणीमुळे चित्रपट २५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार आहे. यासंबंधित चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.



या फोटोमध्ये लिहिलं आहे की, “जय जिजाऊ! जय शिवराय! नमस्कार.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणां सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत.

यासाठी लागणार काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे रहाल ही खात्री आहे. हर हर महादेव.”हा फोटो शेअर करत चिन्मय यानं लिहिलं आहे की, “जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं…! आम्हीही शिवरायांचे मावळे आहोत, अडचणींवर मात करणार आणि २५ ऑगस्टला तुमच्या भेटीस नक्की येणार…!”

Subedar upcoming movie release date

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात