काँग्रेस दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा लढवणार; I-N-D-I-A मध्ये ‘आप’चे राहणे अशक्य!


काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टीविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात I-N-D-I-A आघाडी केली आहे. मात्र ही आघाडी झाल्यापासून ती तुटल्याच्याच अधिक बातम्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. आता काँग्रेसने दिल्लीतील सातही जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत आम आदमी पक्ष राहुल गांधींच्या I-N-D-I-A मध्ये प्रवेश करू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. Congress to contest all Lok Sabha seats in Delhi INDIA is impossible for Aap to stay

काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टीविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात ही बैठक झाली. काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या, “तीन तास चाललेल्या बैठकीत राहुल गांधी, खर्गे, केसी वेणुगोपाल आणि दीपक बाबरिया उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील सर्व 7 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात महिने बाकी असून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सातही जागांसाठी तयारी करण्यास सांगितले आहे.

दिल्लीत शेवटची लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झाली होती. भाजपाने सर्व 7 जागा जिंकल्या होत्या.

Congress to contest all Lok Sabha seats in Delhi INDIA is impossible for Aap to stay

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!