पुण्यात म्युझिक कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान; गायिकेने प्रेक्षकांमध्ये भिरकावला तिरंगा!

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

पुणे : देश आज आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करत आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण  करून देशाला संबोधित केले. याशिवाय देशभरात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र पुण्यात रविवारी रात्री एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबधित गायिकेविरोधात गुन्हा देखील नोंदवला आहे. National flag desecration at music concert in Pune The singer threw tricolor in the audience

प्राप्त माहितीनुसार पुणे उपनगरातील मुंढवा भागात रविवारी रात्री म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं गेलं होतं. या ठिकाणी युक्रेनियन गायिका  उमा शांती हिच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी उमा शांती हिच्या दोन्ही हातात तिरंगा ध्वज होता आणि ती गाणं गात होती. दरम्यान उत्साहाच्या भरात तिने दोन्ही हातांमधील तिरंगा ध्वज प्रेक्षकांच्या दिशेने भिरकवला. तिच्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

तिचे हे कृत्य राष्ट्रध्वज हाताळण्याच्या नियमांच्या विरोधातील व अवमानकारक असं असल्याने तिच्या विरोधात  अॅड. अशुतोष भोसले यांनी मुंढवा पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्ररीनंतर पोलिसांनी ज्या बँडकडून या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या शांती पिपल बँडसह राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी गायिका उमा शांती विरोधात गुन्हा नोंदवला. या कृत्याच्या व्हायर व्हिडीओवर नागरिकांमधून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

National flag desecration at music concert in Pune The singer threw tricolor in the audience

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात