‘ED’ने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी पाठवले समन्स !

 जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मंगळवारी (8 ऑगस्ट) समन्स पाठवले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सोरेन यांच्यावर सुमारे 1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने सोरेनच्या निकटवर्तीय पंकज मिश्राला यापूर्वीच अटक केली आहे. आता याप्रकरणी चौकशीसाठी सोरेन यांना १४ ऑगस्ट रोजी हजर  राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. ED summons Jharkhand Chief Minister Hemant Soren for questioning

तत्पूर्वी, 18 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि सुमारे 10 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजन, कोलकाता येथील व्यापारी अमित अग्रवाल, न्यूक्लियस मॉलचे मालक आणि व्यापारी बिष्णू अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

कर आयुक्तांनी रांचीमधील लष्कराच्या जमिनीवर कब्जा केल्याचा अहवाल सरकारला सादर केला होता. बनावट नाव आणि पत्त्याच्या आधारे लष्कराच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे या अहवालात म्हटले आहे. रांची महापालिकेने याबाबत तक्रार केली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये, व्यावसायिक विष्णू अग्रवाल, अमित अग्रवाल यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते, ज्यामध्ये ईडीला अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी 8 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्र्यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. यानंतर, ईडीला हेमंत सोरेन यांच्या बँक खात्याशी जोडलेले चेकबुक मिळाले. ही माहिती समोर आल्यानंतर त्याचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले. आता ईडीने त्यांना 14 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे.

ED summons Jharkhand Chief Minister Hemant Soren for questioning

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात