भाजप खासदार राम शंकर कथेरिया यांना मोठा दिलासा, आग्रा कोर्टाने दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

अपील निकाली निघेपर्यंत शिक्षेवरील स्थगिती कायम राहणार आह

विशेष प्रतिनिधी

आग्रा : उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजपा खासदार राम शंकर कथेरिया यांना आग्रा कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने कथेरिया यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सांगितले की, अपील निकाली निघेपर्यंत शिक्षेवरील स्थगिती कायम राहणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. Big relief for BJP MP Ram Shankar Katheria Agra court suspended the sentence for two years

5 ऑगस्ट 2023 रोजी आग्राच्या खासदार/आमदार न्यायालयाने इटावा येथील भाजपा खासदार राम शंकर कथेरिया यांना मारहाणीच्या जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेसोबतच न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.

भाजप खासदार रामशंकर कथेरिया यांना 2011 मध्ये आग्रा येथील खासदार/आमदार न्यायालयाने दोषी ठरवले होते. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रामशंकर कथेरिया यांच्यावर कलम 147 आणि 323 अंतर्गत आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Big relief for BJP MP Ram Shankar Katheria Agra court suspended the sentence for two years

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात