पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या संयंत्राचे उद्घाटनदेखील यावेळी झाले.

विशेष प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटनदेखील यावेळी झाले. या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. Prime Minister Narendra Modi inaugurated two lines of the first phase of Pune Metro

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डुडुळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ११९० सदनिका बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पेठ क्र.१२ टप्पा-२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ६४५२ घरकुलांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेमार्फत वडगाव, खराडी आणि हडपसर येथे बांधण्यात आलेल्या २६५८ घरकुलांचे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या १२८८ सदनिकांच्या चाव्या प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आल्या.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक ही ६.९ कि.मी. ची मार्गिका असून यावर ४ स्थानके आहेत. गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत दुसरी मार्गिका असून या ४.७ कि.मी. च्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रोच्या या नव्या मार्गिकांमुळे पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक ही महत्त्वाची स्थानके जोडली जाणार आहेत.

Prime Minister Narendra Modi inaugurated two lines of the first phase of Pune Metro

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात