महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते पदावर अखेर विजय वडेट्टीवार यांची निवड

Vijay Wadettiwar Says We will not Allow Elections Until OBC Reservation Issue Solves

दिल्लीतून काँग्रेस हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसकडून विजय  वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली हायकमांडने अखेर यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्यापासून रिक्त  असलेल्या या पदासाठी अखेर चेहरा मिळाला आहे. विधीमंडळात पावसाळी अधिवेशन संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना विरोधी पक्षनेता ठरलेला आहे. Vijay Wadettiwar was elected as the Leader of the Opposition in Maharashtra

काँग्रेस हायकमांडने जरी विजय वड्डेटीवारांना विरोधी  पक्षनेता केले असले तरी विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी ही बाळासाहेब थोरातांकडेच राहणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सुरुवातीस राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांच्या नावांची चर्चा होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे आणि सुनील केदार यांचीही नावे पुढे आली होती.

राष्ट्रवादी  काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात जवळपास ३५ आमदांनी बंडखोरी करत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केल्याने, राष्ट्रवादींच्या आमदारांचे संख्याबळ कमी झाले होते. परिणामी विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा ठोकण्यात आला होता. ज्यास महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांची हरकत नव्हती.

Vijay Wadettiwar was elected as the Leader of the Opposition in Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात