विशेष प्रतिनिधी
पुणे : बॉलीवूड मधली प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहली याची पत्नी असलेली अनुष्काची आणखी एक ओळख म्हणजे आर्मी ऑफिसर ची मुलगी!आणि हीच ओळख मला जास्तच आवडते. किंबहुना मी आर्मी ऑफिसर ची मुलगी असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे असं मत एका मुलाखतीत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने व्यक्त केलं.Anushka Sharma the girl of Army Man !
आज 26 जुलै कारगिल विजय दिवस! यानिमित्ताने आज अनेक सेलिब्रिटीज नि आपल्या समाज माध्यमांतून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आपल्या वडिलांची कारगिल युद्धातील एक आठवण एका मुलाखतीत सांगितली होती. तिचे वडील १९८२ नंतर अनेक युद्धांत ते सहभागी होते. ते कारगील युद्ध लढाई देखील लढले आहे.
तिचे वडील जेव्हा कारगिल युद्धातून घरी फोन करायचे त्या वेळची एक आठवण अनुष्काने सांगितली आहे.
View this post on Instagram A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
कारगील युद्धाचे ते दिवस होते. अनुष्का तेव्हा खूप लहान होती. तिच्या आईला बघून ती घाबरायची. ती सतत टीव्ही वरील न्यूज चॅनल बदलायची. युद्धात शहीद झालेल्या जवानांची टीव्हीवर आकडेवारी ऐकून ती अस्वस्थ व्हायची. कारगील युद्धातून जेव्हा अनुष्काचे वडील तिला कॉल करायचे तेव्हा युद्धात असल्याने जास्त बोलायचे नाही. तरी अनुष्का तेवढ्या वेळात कॉलवर त्यांना तिच्या शाळेतल्या गप्पा, तिच्या मित्र मैत्रीणी विषयी सगळं सांगायची. तेव्हा ते युद्धावर असायचे याची तिला जाणीव असावी एवढी ती वयाने मोठीही नव्हती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App