ममता बॅनर्जींनी त्रिपुरात मोठा धक्का, तृणमूल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच दिला राजीनामा!

Calcutta HC Orders Police To Register All Cases Of The Victims Of post Poll Violence

पीयूष कांती बिस्वास पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

अगरतला : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्रिपुरात मोठा धक्का बसला आहे. कारण, त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच राजीनामा दिला आहे,  एवढंच नाहीतर पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. Trinamool Congress State President Piyush Kanti Biswas resigns in Tripura Mamata Banerjee shocked

त्रिपुरा तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांनी मंगळवारी (२५ जुलै) आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने पूर्ण ताकद लावली होती, पण कामगिरी फारच खराब होती.

पीयूष कांती बिस्वास यांनी आपला राजीनामा तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यात त्यांनी लिहिले की, मी तृणमूल काँग्रेसच्या त्रिपुरा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. यासोबतच मी तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. अभिषेक बॅनर्जी मी तुमचा आभारी आहे. ज्यांनी मला ही जबाबदारी दिली.

 निवडणुकीत टीएमसीला केवळ 0.88 टक्के मतं-

फेब्रुवारी महिन्यात ६० सदस्यीय त्रिपुरा विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. ज्यामध्ये पक्षाने 28 जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र टीएमसीला एकही जागा जिंकता आली नव्हती. या निवडणुकीत टीएमसीला केवळ 0.88 टक्के मते मिळाली, तर या निवडणुकीत भाजपाने 32 जागा जिंकल्या होत्या.

Trinamool Congress State President Piyush Kanti Biswas resigns in Tripura Mamata Banerjee shocked

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात