मणिपूरवर चर्चा करण्यापासून विरोधक का पळत आहेत?, सत्य देशासमोर यावे अशी आमची इच्छा – अमित शाह

विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत म्हणाले की, “मी सभागृहात या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे. मी विरोधकांना विनंती करतो की, या मुद्द्यावर चर्चा होऊ द्यावी. देशाला या संवेदनशील प्रकरणातील सत्य माहीत असणे महत्त्वाचे आहे. पण विरोधक या मुद्द्यावरून का पळून जात आहेत हे मला समजत नाही.” Why are the opposition running away from discussing Manipur Amit Shah

मात्र विरोधक आपल्या मागणीवर ठाम असून लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यानंतर लोकसभा अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. लोकसभेचे कामकाज उद्या, २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

संरक्षण मंत्री आणि लोकसभेतील उपनेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर चर्चा करून संसदेतील मणिपूरच्या मुद्द्यावरील गतिरोध संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी अशी मागणी करत आहेत. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले.

Why are the opposition running away from discussing Manipur Amit Shah

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात