अखेर मस्क यांनी ट्वीटरची ओळख बदलली, ‘ब्लू बर्ड’ ऐवजी आता असणार ‘X’ लोगो!


ट्विटरचा लोगो बदलण्यापूर्वीच मस्कने त्यांचे प्रोफाइल पिक्चर बदलले आहे.

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : ट्विटरच्या ओळखीशी निगडीत असलेला ‘ब्लू बर्ड’  आता उडून गेला आहे. कंपनीशी वर्षानुवर्षे जोडलेली ही ओळख आता बदलली आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरची ब्रँड इमेज आणि लोगो X मध्ये बदलला आहे, त्यानंतर X आता ट्विटरवर कंपनीच्या प्रोफाइलमध्ये दिसत आहे. Musk changed the identity of Twitter instead of Blue Bird there will be an X logo

यानंतर, जेव्हा वापरकर्ते ट्विटर उघडतील, तेव्हा ट्विटर थेट X लोगोसह उघडेल, जिथे बर्ड लोगोच्या जागी X आता दिसेल. याची झलक ट्विटरच्या मुख्यालयावरही पाहायला मिळाली. मस्क यांनी X.com थेट Twitter.com शी लिंक केले आहे. म्हणजेच x.com लिहिल्यावर तुम्ही थेट ट्विटरच्या वेबसाइटवर पोहोचाल.

इलॉन मस्क म्हणाले की, आम्ही ट्विटरचे रिब्रँड करणार आहोत. आता ट्विटरचा लोगो बर्ड वरून एक्स असा बदलण्यात येणार आहे. तो आज (24 जुलै) थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तसेच, ट्विटरचा लोगो बदलण्यापूर्वीच मस्कने त्यांचे प्रोफाइल पिक्चर बदलले आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चरमध्ये ‘X’ लोगो लावला आहे. मस्क यांनी एक व्हिडिओ देखील पिन केला आहे, ज्यामध्ये ट्विटरचा लोगो X मध्ये बदलताना दिसत आहे.

Musk changed the identity of Twitter instead of Blue Bird there will be an X logo

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात