महायुतीत “नव्या मित्रा”ला सामावून घेण्यासाठी शिंदे – फडणवीसांकडून नेते – कार्यकर्त्यांचे प्रबोधन!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस शिवसेना भाजप महायुती सरकार मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या “नव्या” मित्र पक्षाला खऱ्या अर्थाने सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे वेगवेगळे प्रबोधन केले. पण या प्रबोधनातले मुख्य सूत्र 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळविण्यासाठी “नव्या” मित्राला आपल्यात सामावून घ्या, हेच राहिले. Shinde-Fadnavis urges leaders-activists to accommodate “new friend” in Grand Alliance

शिवसेनेशी आपली भावनिक मैत्री आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसशी आपण “पॉलिटिकल मैत्री” केली आहे, हे सांगायला देवेंद्र फडणवीस विसरले नाहीत. त्याचवेळी या “पॉलिटिकल मैत्रीचे” रूपांतर राष्ट्रवादी काँग्रेस जर आपल्याशी प्रामाणिक राहिली तर 10 वर्षांनंतर भावनिक मैत्रीतही होऊ शकते, असे मधाचे बोट देवेंद्र फडणवीस यांनी लावले.

https://youtu.be/mAdqvoc-Eso

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि खातेवाटपा बाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कमालीची अस्वस्थता असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे प्रबोधन केले. आपला जन्म सत्तेसाठी झालेला नाही. आपण हिंदुत्वासाठी भाजपशी युती केली आहे. हिंदुत्व हाच आपला श्वास आहे. बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी गद्दारी केली आणि बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवले होते, त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या विरोधात आपण आहोत हे विसरू नका, असे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातला मेळाव्यात आवर्जून सांगितले. आपण व्यापक भूमिका घेतल्याशिवाय आपल्याला महाविजय मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली फार मोठी कामे होणार असल्याने आपल्याला “नवीन” मित्राला आपल्या सामावून घ्यावे लागेल, याची आठवणही एकनाथ शिंदे यांनी करून दिली.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या विषयावरून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीत फार मोठे मतभेद असल्याचे नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी सेट केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस यांनी आपल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले आणि मंत्रिमंडळ विस्तार तसेच खातेवाटप याची राजकीय पार्श्वभूमी तयार केली, असेच आज दिसून आले.

Shinde-Fadnavis urges leaders-activists to accommodate “new friend” in Grand Alliance

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात