Script 4 : बंड की आशीर्वाद??; कराडमध्ये पत्रकाराने “डबल गेम” सूचित करताच पवार चिडले; पत्रकारितेच्या “दर्जावर” घसरले!!

प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कथित बंड आणि त्यानंतर शरद पवारांच्या गटातल्या प्रतिक्रिया, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेचे मराठी माध्यमांचे रिपोर्टिंग हे सगळे “पवार नॅरेटिव्हला” अनुकूल चाललेले असताना कराड मधल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अजितदादांचे बंड की आशीर्वाद??, असा खोचक प्रश्न विचारल्यानंतर पवार चिडले आणि पत्रकारितेच्या दर्जावर घसरले!!Pawar was furious when a journalist suggested a “double game” in Karad

शरद पवारांनी आज कराडमध्ये प्रीतीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथे जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर कराडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र त्यावेळी एका पत्रकाराने अजित पवारांचे हे बंड आहे की तुमचा आशीर्वाद??, असा खोचक सवाल करताच पवार चिडले. कारण त्यातून पवारांची “डबल गेम” सूचित होत होती आणि ही “डबल गेम” आपण केल्याची बातमी नको त्या वेळी महाराष्ट्रात पसरण्याची भीती पवारांना वाटली. त्यामुळे पवारांनी लगेच त्या पत्रकाराला झापले. आशीर्वाद हा शब्द वापरून तुम्ही पत्रकारितेचा दर्जा घसरवू नका, असे पवारांनी पत्रकाराला सुनावले.



मी पक्ष बांधणीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा काढतो आहे. हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सर्वसामान्य लोकांना समजते आहे. हे तुम्ही पण समजावून घ्या. आशीर्वाद वगैरे शब्द वापरून पत्रकारितेचा दर्जा घसरवू नका, अशा शब्दांत शरद पवारांनी त्या पत्रकाराला झापले.

पण त्याचवेळी पवारांना केवळ “आशीर्वाद” शब्दाचा तिखट झटका बसल्याचेच स्पष्ट झाले. कारण त्यातून पवारांची दोन डगरींवर पाय ठेवण्याची सवय महाराष्ट्र समोर येत होती. पवार असे “डबल गेम” राजकारण करतात. त्यामुळे त्यांचा अजित पवारांच्या बंडाला छुपा पाठिंबा किंबहुना आशीर्वादच आहे, असे सूचित होत होते आणि हे आपल्याला नको त्यावेळी सूचित होऊ नये म्हणूनच पवारांनी ताबडतोब त्या पत्रकाराला झापण्याची चलाखी केली आणि तो प्रश्न तिथल्या तिथे थांबविला. बंड की आशीर्वाद??, या प्रश्नाला उत्तर देणे पवारांनी टाळले.

Pawar was furious when a journalist suggested a “double game” in Karad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात