प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाणा येथे झालेल्या बस अपघात स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली त्याचबरोबर जखमी झालेल्या प्रवाशांची देऊळगावराजा येथील रुग्णालयात भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.Buldhana Bus Accident: Chief Minister, Deputy Chief Minister visit the incident site
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात होऊन भीषण आग लागल्याने काही प्रवाशांनी वेळेत बसमधून बाहेर आल्यामुळे त्यांचा जीव बचावला, तर काही जण जखमी झाले. यावेळी या रुग्णालयातील डॉक्टरांकडून जखमींवर सूरु असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली. तसेच या सर्वांवर शासकीय खर्चाने उपचार करावेत तसेच गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, सहकार मंत्री अतुल सावे, एमएसआरडिसी आणि जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App