वृत्तसंस्था
नवी दिल्ली :आपल्या यशस्वी अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावर परत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरत तब्बल 10 लाख बूथ प्रमुखांना भोपाळ मधून संबोधित केले. भाजपचे तब्बल 10 लाख बूथ प्रमुख देशातल्या सर्व राज्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भोपाळ मधल्या कार्यक्रमात जोडले गेले. भाजपचा आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बूथप्रमुखांना संबोधित केलेच, पण त्याचबरोबर काही निवडक प्रश्न उत्तरे देखील केली. यामध्ये त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देत प्रत्येक बुथ कार्यकर्त्याने समाजसेवकाच्या रूपात जनतेला भेटावे. छोट्या मोठ्या कामांमधून जनतेसमोर सतत राहावे, असा मोलाचा सल्ला दिला.
त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी घराणेशाही चालविण्याऱ्या पक्षांना जबरदस्त टोला हाणला. भाजप कार्यकर्ते ते नाहीत, की जे एसी रूम मध्ये बसून पार्टी चालवतात आणि फतवे काढतात. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जनतेशी जोडला गेला आहे. ऋतू कोणताही असो कडक उन्हाळा असो, पावसाळा असो अथवा कडक थंडी असो, गावागावात जाऊन नगरा नगरात जाऊन, शहरा शहरात जाऊन कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता जनतेशी स्वतःला जोडून घेतो आणि जनतेला आपल्यात सामावून घेतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी घराणेशाही चालवणाऱ्या पक्षांना टोला हाणला.
#WATCH भाजपा के कार्यकर्ता उनमें से नहीं हैं जो AC वाले कमरों में बैठकर पार्टियां चलाते हैं और फतवे निकालते रहते हैं। हम तो गांव-गांव जाकर हर मौसम, हर परिस्थिति में जनता के बीच जाकर खुद को खपाने वाले लोग हैं: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भोपाल pic.twitter.com/wvFpPkTPmo — ANI_HindiNews (@AHindinews) June 27, 2023
#WATCH भाजपा के कार्यकर्ता उनमें से नहीं हैं जो AC वाले कमरों में बैठकर पार्टियां चलाते हैं और फतवे निकालते रहते हैं। हम तो गांव-गांव जाकर हर मौसम, हर परिस्थिति में जनता के बीच जाकर खुद को खपाने वाले लोग हैं: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भोपाल pic.twitter.com/wvFpPkTPmo
— ANI_HindiNews (@AHindinews) June 27, 2023
भाजपचा बूथ कार्यकर्ता ही पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे आणि या बूथ कार्यकर्त्यांमुळेच केंद्र सरकारच्या धोरणांना बळ मिळाले आहे. बूथ कार्यकर्त्यांनी सूचना केल्यामुळेच उज्ज्वला सारखी योजना तयार झाली आणि तिचे केंद्र सरकारच्या धोरणात रूपांतर झाले, याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.
त्याचवेळी त्यांनी आपला गुजरात मधल्या मणिनगर विधानसभा मतदारसंघातला अनुभव सांगितला. मणिनगर मध्ये मोदींनी अंगणवाडी बालकांचे आरोग्य सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. कार्यकर्त्यांना तयार केले आणि प्रत्येक अंगणवाडीत सातत्याने संपर्क ठेवून तिथल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे कुपोषण घालवले. सतत राजकारण करण्यापेक्षा भाजपचा बूथ कार्यकर्ता सेवाभावाने जनतेशी जोडले गेला, तर आपले काम अधिक सहज सुलभतेने साध्य होते, याची आठवण पंतप्रधान मोदींनी बूथ कार्यकर्त्यांना करून दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App