अभिमानास्पद : पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध इमारतींवर झळकला भारताचा ‘तिरंगा’

न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी ट्विट करत याबाबत माहिती दिली

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क: न्यूयॉर्क शहरातील लोअर मॅनहॅटन येथील वन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या ऐतिहासिक राज्य दौऱ्यात त्यांचे स्वागत करण्यासाठी तिरंगा ध्वजाची रोषणाई करण्यात आली होती. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी ट्विट करत याबाबत माहिती दिली, “भारत आणि यूएस यांच्यातील मैत्रीचा पुरावा, तिरंग्याच्या रोषणाईने उजळलेले प्रतिष्ठित लोअर मॅनहॅटन लँडमार्क वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, ऐतिहासिक राज्य भेटीवर पंतप्रधान मोदींचे स्वागत करत आहे.”  Indias Tricolor displayed on famous American building to welcome Prime Minister Modi

याशिवाय पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंगही तिरंग्यात उजळून निघाली होती. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. भारत-अमेरिका मैत्री जगात एक चांगले स्थान निर्माम करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत टेक्नॉलॉजी हँडशेक कार्यक्रमात भाग घेतला. येथे बायडेन म्हणाले – भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर सहकार्याचा अर्थ प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या संक्षिप्त भाषणात मोदी म्हणाले- प्रतिभा आणि तंत्रज्ञान एकत्र आले तर ते सोनेरी भविष्य घडवते.

Indias Tricolor displayed on famous American building to welcome Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात