Ayushman Bharat – महाराष्ट्रातील २ कोटींहून अधिक कुटुंबांना मिळणार संयुक्त ई-कार्ड ; १९०० आजारांवर होणार इलाज!


पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण केले जाणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केंद्र सरकारच्या आयुष्‍मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा आढावा शुक्रवारी दुपारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे घेतला. केंद्र आणि राज्य शासनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Union Minister Dr Mansukh Mandaviya took a review of the Central Governments Ayushman Bharat Pant Pradhan Jan Arogya Yojana

केंद्र सरकारच्या आयुष्‍मान भारत – पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून महाराष्ट्रातील 2.2 कोटी कुटुंबांना संयुक्त ई-कार्ड देण्याचा निर्णय झाला. याचा लाभ राज्यातल्या 12 कोटी नागरिकांना होणार आहे.

ऑगस्ट 2023 पर्यंत 1 कोटी नागरिकांना संयुक्त ई-कार्ड देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले. यातून 1900 आजारांवर इलाज होणार असून प्रत्येक नागरिकाला प्रतिवर्ष 5 लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. स्वस्त औषधे उपलब्ध होण्यासाठी जेनेरिक औषध केंद्रांची संख्या 1 हजार पर्यंत वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत नर्सिंग, क्रिटिकल केअर युनिट, सार्वजनिक आरोग्य केंद्र आदी आरोग्य व्यवस्थांच्या विकासाचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात केंद्र सरकारने 3 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. केंद्राकडून अतिरिक्त निधीची मदत राज्याला करण्यात येईल असेही ठरले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Union Minister Dr Mansukh Mandaviya took a review of the Central Governments Ayushman Bharat Pant Pradhan Jan Arogya Yojana

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*