आधी मंत्री आणि आता ‘राजद’ आमदाराने पाजळले ‘दिव्य ज्ञान’, म्हणाले ‘’मशिदीत लिहिले गेले रामचरितमानस…’’ आता बोला…!

भाजपाने साधला जोरदार निशाणा; जदयूने म्हटले अशी विधानं टाळली पाहिजे.

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्यानंतर आता आरजेडी आमदार रितलाल यादव  यांनी रामचरितमानस संदर्भात एक  अजब विधान केल्याने बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. द्वेष पसरवणारे आणि समाजात फूट पाडणारे हे पुस्तक असल्याचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी म्हटले होते. आता त्यांच्याच पक्षाचे आमदार रितलाल यांनी गुरुवारी (१५ जून) मशिदीत रामचरितमानस लिहिण्यात आल्याचे म्हणत ‘दिव्य ज्ञान’ पाजळले आहे. Janata Dal United MLA Ritlal Yadav has said that Ramcharitmanas was written in the mosque

दानापूरचे राजदचे आमदार रितलाल यादव म्हणाले की, भाजपाचे लोक मुस्लिमांचा द्वेष करतात, हिंदू-हिंदुत्वावर बोलतात. त्यांच्या पक्षातील सर्व मुस्लिमांना त्यांनी काढून  टाकावे. इतिहास बघा की रामचरितमानस मशिदीत लिहिले गेला.

जेडीयूने म्हटले – अशी विधाने टाळली पाहिजेत –

आरजेडी आमदार रितलाल यादव यांच्या रामचरितमानसवरील टिप्पणीवर जेडीयूने निशाणा साधला आहे. जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा म्हणाले की, लोक त्यांच्या सोयीनुसार कोणतेही अनियंत्रित विधान करतात. अशी विधाने टाळली पाहिजेत. यामुळे जनतेत चुकीचा संदेश जातो. तसे, कोणतीही व्यक्ती कोणत्याही धर्मावर श्रद्धा ठेवू शकते. ही जनतेची वैयक्तिक बाब आहे, पण अशा प्रकारचा अजेंडा तर भाजपाचा असतो. धर्माच्या नावाखाली तणाव निर्माण करणे.

भाजपने रितलाल यांना प्रत्युत्तर दिले –

या संपूर्ण प्रकरणावर भाजपाही गप्प बसली नाही. भाजपाचे प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांनी रितलाल यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, जगातील सर्वात जुना धर्म हिंदू सनातन धर्म आहे. त्याची संस्कृती जगभरातील लोकांनी स्वीकारली आहे. त्या धर्माविरुद्ध बोलणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. रामचरितमानसावर वक्तृत्व करणाऱ्यांना ज्ञानाची गरज आहे. आधी माहिती घ्या मग रामायणाच्या रचनेबद्दल बोला.

Janata Dal United MLA Ritlal Yadav has said that Ramcharitmanas was written in the mosque

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात