या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, यावरून भाजपाने टीका केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मेवाड : राजस्थानमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समक्ष एका कार्यक्रमाच्या मंचावर काहीजण राष्ट्रगीत सुरू असताना नाचताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत भाजपाच्या निशाण्यावर आहेत. Insult of National Anthem in front of Chief Minister Ashok Gehlot
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री गेहलोत मेवाड दौऱ्यावर आले होते. यादरम्यान मगराड गावात सभा झाली, त्यानंतर राष्ट्रगीत सुरू होताच स्टेजवर उपस्थित काही लोक नाचू लागले. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे आणि प्रश्न उपस्थित करताना त्यांनी टोमणा मारला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री गेहलोत मंचावर उपस्थित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राष्ट्रगीत वाजत आहे आणि त्याचवेळी त्यांच्यासमोरच काहीजण बिनधास्त नाचत आहेत. अखरे, यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्या नाचणाऱ्या लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री गेहलोत यांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेवरून भाजपाने टीका केली आहे. रमिला खाडिया आणि बांसवाडा जिल्हाप्रमुख रेश्मा मालवीय या व्हिडिओमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी नाचत असल्याचा दावा केला जात आहे.
गजेंद्रसिंह शेखावत यांची टीका –
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रश्न विचारत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “गेहलोत साहेब याला विनाकारण निषेध म्हणतील, त्यांचे समर्थकही विपर्यास करतील पण खरंच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचा अवमान होत नाही का? गेहलोत यांचे स्वतःचे लक्ष नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री शेखावत यांनी केला असून, हे कसले आयोजन आहे, आपण काय उदाहरण मांडत आहोत? असा प्रश्नही शेखावत यांनी उपस्थित केला आहे.
गहलोत साहब इसे बेवजह का विरोध कहेंगे, उनके द्वारा प्रायोजित समर्थक कुतर्क करेंगे किंतु क्या यह उनकी उपस्थिति में राष्ट्रगान की अवहेलना नहीं हो रही? स्वयं गहलोत जी को ध्यान नहीं है। यह किस तरह का आयोजन है और मुख्यमंत्री कैसा उदाहरण प्रस्तुत कर रहे हैं?#CorruptCM pic.twitter.com/Lfg4AosBIk — Gajendra Singh Shekhawat (मोदी का परिवार) (@gssjodhpur) June 14, 2023
गहलोत साहब इसे बेवजह का विरोध कहेंगे, उनके द्वारा प्रायोजित समर्थक कुतर्क करेंगे किंतु क्या यह उनकी उपस्थिति में राष्ट्रगान की अवहेलना नहीं हो रही? स्वयं गहलोत जी को ध्यान नहीं है।
यह किस तरह का आयोजन है और मुख्यमंत्री कैसा उदाहरण प्रस्तुत कर रहे हैं?#CorruptCM pic.twitter.com/Lfg4AosBIk
— Gajendra Singh Shekhawat (मोदी का परिवार) (@gssjodhpur) June 14, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत चित्तोडगडच्या भदेसर तहसीलच्या मगराड गावात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताची धून सुरू असताना गेहलोत मंचावर उभा होते, त्यानंतर अचानक मंचावर उपस्थित काही काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रगीताच्या तालावर नाचण्यास सुरुवात केली. अखेर काही क्षणानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नाचणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App