चुनावी हिंदू नंतर आता काँग्रेसवर मौसमी हिंदू झाल्याची टीका; राजनाथ सिंहांचा प्रहार

वृत्तसंस्था

राजगड (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे टेम्पल रन केले, त्यावेळी काँग्रेसवर भाजपच्या नेत्यांनी चुनावी हिंदू झाल्याची टीका केली होती. म्हणजे केवळ निवडणुका आल्या की मंदिरांमध्ये जाऊन आरत्या आणि प्रार्थना करायच्या आणि बाकीच्या वेळी हिंदूंना शिव्या द्यायचा असा त्यांचा उफराटा कारभार आहे, असे भाजपच्या नेत्यांनी शरसंधान साधले होते. After electoral Hinduism, Congress has now become a seasonal Hindu

त्यानंतर काँग्रेसवर मौसमी हिंदू झाल्याची टीका भाजपचे नेते आता करू लागले आहेत. मध्य प्रदेशातील राजगड मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जाहीर सभा झाली. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर मौसमी हिंदू झाल्याचे शरसंधान साधले. आता हे मौसमी हिंदू लोक नर्मदेची आरती करत आहेत. वेगवेगळ्या देवळांमध्ये जाऊन प्रार्थना करत आहेत. पण नर्मदेला एक जिवंत प्रेरणास्त्रोत म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच मान्यता दिली, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली आणि त्याचवेळी काँग्रेसचे वाभाडे काढले.

कर्नाटक मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसने हिंदुत्व या मुद्द्यावर भाजपवर टीका केली. पण हनुमान चालीसा हा मुद्दा आपल्यावर उलटतोय हे पाहताच राज्यभर हनुमान मंदिरे उभारण्याची घोषणा केली. काँग्रेसच्या या धोरणालाच राजनाथ सिंह यांनी मौसमी हिंदू असे संबोधले आहे.

After electoral Hinduism, Congress has now become a seasonal Hindu

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात