आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवर उठताना दिसत होते.
विशेष प्रतिनिधी
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील वृंदावन मधील लोकप्रिय प्रेम मंदिराच्या मागील भागात भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले आणि आगीचे लोळ पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. Massive fire breaks out in the backside area of Prem Mandir in Vrindavan Mathura
आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवर उठताना दिसत होते. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
#WATCH | UP: Massive fire breaks out in the backside area of Prem Mandir in Vrindavan, Mathura. Two fire tenders present at the spot. pic.twitter.com/9JczIL8x3g — ANI (@ANI) June 13, 2023
#WATCH | UP: Massive fire breaks out in the backside area of Prem Mandir in Vrindavan, Mathura. Two fire tenders present at the spot. pic.twitter.com/9JczIL8x3g
— ANI (@ANI) June 13, 2023
प्रेममंदिराच्या ज्या भागात आग लागली ती वस्तुतः स्टोअर रूम असल्याचे बोलले जात आहे. लाकूड आणि बांधकामाशी संबंधित वस्तू येथे ठेवण्यात आल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाला समर्पित पांढऱ्या संगमरवराने बनवलेले प्रेम मंदिर देशातच नव्हे तर जगभरात खूप लोकप्रिय आहे. येथे दरवर्षी दूरदूरवरून भाविक येतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more