युक्रेनचे सर्वात मोठे धरण उद्ध्वस्त, 80 गावे पुरात बुडण्याचा धोका; रशिया-युक्रेनचे एकमेकांवर आरोप

वृत्तसंस्था

कीव्ह : रशियासोबतच्या युद्धात युक्रेनचे सर्वात मोठे धरण काखोव्का मंगळवारी उद्ध्वस्त झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार धरणाचे पाणी युद्धभूमीपर्यंत पोहोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी करण्यात येत आहेत. खरसोन परिसरातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रशियन वृत्तसंस्थेनुसार, 80 गावांमध्ये पुराचा धोका आहे. पुढील 24 तास या गावांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. Ukraine’s largest dam collapses

उत्तर युक्रेनमधील नीपर नदीवरील काखोव्का धरण रशियन-व्याप्त प्रदेशात आहे. युक्रेनच्या हल्ल्यात रशियन सैन्याने आपला विनाश झाल्याचे सांगितले आहे. येथे युक्रेनच्या नॉर्दर्न कमांडच्या लष्करी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, धरणावर रशियाने हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनीही धरण फुटल्यामुळे विध्वंस होण्याची भीती लक्षात घेऊन आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

धरणातून अणु प्रकल्पाला पाणीपुरवठा

डनिपर नदीवरील काखोव्का धरण 30 मीटर उंच आहे आणि 3.2 किमी क्षेत्र व्यापते. हे 1956 मध्ये सोव्हिएत राजवटीत बांधले गेले होते. या धरणातूनच क्रिमिया आणि झापोरिझिया न्यूक्लियर प्लांटला पाणीपुरवठा केला जातो. नोव्हा काखोव्काचे महापौर वोलोडिमिर कोवालेन्को यांनी सांगितले की, परिसरातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. प्राणिसंग्रहालय, थिएटर, कॅफे आणि खेळाची मैदाने पाण्यात बुडाली आहेत. तेथून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

हिटलरच्या सैन्याला रोखण्यासाठी 1941 मध्येही धरण उद्ध्वस्त

त्याच वेळी ज्या विध्वंसासाठी रशिया आणि युक्रेन एकमेकांवर आरोप करत आहेत ते धरण 1941 मध्येही उद्ध्वस्त झाले होते. 29 ऑगस्ट 1941 रोजी सोव्हिएत युनियनचे प्रवक्ते लुझोव्स्की यांनी माध्यमांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, झापोरिझिया येथील डनिपर नदीवर बांधलेले धरण उद्ध्वस्त झाले आहे. जेणेकरून ते नाझींच्या हाती लागू नये. धरण नष्ट करून, युएसएसआरने जर्मन सैन्याला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. हे धरण सोव्हिएत युनियनने आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत बांधले होते. ते बांधण्यासाठी 8 वर्षे लागली होती. त्यामुळे डनिपर नदीच्या दोन्ही बाजूने पाणीपुरवठा पूर्ण झाला.

Ukraine’s largest dam collapses

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात