विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : येत्या 10 जून रोजी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पंचविशीत प्रवेश करत आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजस्थान नव्या काँग्रेसचा जन्म होण्याची शक्यता आहे. कारण सध्या राजस्थान आणखी एका काँग्रेसचे “राजकीय डोहाळे” लागले आहेत. अर्थातच ती काँग्रेस सचिन पायलट यांची असणार आहे. 11 जून रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजेश पायलट यांचा स्मृतिदिन आहे. त्याच दिवशी त्यांचे पुत्र सचिन पायलट आपल्या नव्या काँग्रेसची घोषणा करू शकतात अशी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. Sachin pilot may float a new Congress party in rajasthan
प्रगतिशील काँग्रेस अथवा राजस्थान जनसंघर्ष काँग्रेस यापैकी एक नाव निवडून सचिन पायलट नव्या पक्षाची घोषणा करू शकतात, असे बोलले जात आहे.
सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण!
राजस्थान गेल्या 5 वर्षांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात उभा राजकीय दावा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वारंवार मध्यस्थी करूनही अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला राजकीय संघर्ष थांबायला तयार नाही. सचिन पायलट यांच्या मागणीनुसार सोनिया गांधी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करायला तयार नाहीत. त्यामुळे आसाम मध्ये हेमंत विश्वशर्मा यांनी जसे टोकाचे पाऊल उचलून अखेरीस भाजपमध्ये प्रवेश केला, तसा राजकीय ऑप्शन न स्वीकारता सचिन पायलट राजस्थानात वेगळा प्रादेशिक पक्ष काढून काँग्रेसला आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याच्या बेतात आहेत.
यासाठी त्यांना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या “आय पॅक: या संस्थेने मदत केल्याचे बोलले जाते. सचिन पायलट यांनी मध्यंतरी राजस्थानातल्या वसुंधरा राजे सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत अशोक गेहलोत सरकार कोणतीच कारवाई करत नाही, अशा तक्रारी करून उपोषण केले होते. त्यांनी राजस्थानची छोटेखानी पदयात्राही काढली होती. या सर्व राजकीय उपक्रमात प्रशांत किशोर यांच्या संस्थेनेच सर्व प्रकारची मदत केल्याची चर्चा आहे.
त्यामुळे आता सचिन पायलट राजस्थानात प्रादेशिक पक्ष स्थापन करून आपली नवी राजकीय खेळी सुरू करण्याच्या बेतात आहेत, असे मानले जात आहे. सध्या राजस्थान नव्या काँग्रेसचे डोहाळे राजकीय डोहाळे लागले आहेत कदाचित 11 जून 2023 रोजी सचिन पायलट यांची नवी काँग्रेस जन्माला येईल!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App