प्रतिनिधी
पुणे : अजित दादांचा वेगळाच मुळशी पॅटर्न एकेकाच्या कानाखाली आवाज काढेल असे म्हणून दिला दम!!, असे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घडले अजित दादांनी मुळशीतल्या कार्यकर्त्यांना आपल्या वेगळ्या मुळशी पॅटर्ननुसार दमात घेतले दमात घेतले.Ajitdad has a different root pattern; I gave breath to make noise under each one’s ear!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना कडक शब्दांमध्ये दम दिला. कामं केली नाहीत तर कानाखाली देईन. तुमचं पद काढून घेईन, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
अजितदादा म्हणाले :
तुम्ही कामं करायची आहेत. मुळशीच्या लोकांना पदं दिली आहेत. भांडायचं नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेन. यातून तुमची बदनामी होत नाही, तर आमची बदनामी होते. शरद पवारांची बदनामी होते. हा कुठला फाजीलपणा चाललाय? मी पदाचा राजीनामा घेईन हा? मी फार टोकाचं वागेन मग, अजिबात ऐकून घेणार नाही.
एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसा असतो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सदस्य म्हणून तिथे बसतात. ही कुठली पद्धत आहे. मी हे तर नवीनच बघायला लागलेलो आहे.
तुम्ही भांडू नका नाहीतर तुमची पद काढून घेईन हे मी तुम्हाला प्रांताध्यक्षांसमोर सांगतोय.
मुळशी तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळल्याने अजित पवार संतापल्याची माहिती समोर आली आहे.
“हा वाद पक्षाचा नाही. दोन्ही कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाचेल कार्यकर्ते आहेत. हे दोघेही कार्यकर्ते माजी सभापती आहेत. तसेच त्यापैकी एक कार्यकर्ता एका बँकेचा उपसभापती आहे. आमच्या पक्षात कोणतेही वाद नाहीत. पण त्यांच्यात वैयक्तिक हवेदावे झाले असतील. त्यातून त्यांच्यातील वाद उफाळून आला. तो वाद आम्ही तेव्हाच मिटवला होता, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App