प्रतिनिधी
नाशिक : भांडण दोन शिवसेनांचे लागले आहे. दोन गटांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. पण या घमासानाच्या पट्ट्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सापडले आहेत. धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी अजित दादांना टोला हाणला आहे. Better to spit than to urinate dam, Sanjay raut targets ajit pawar
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या बद्दल प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत परवाच त्यांच्याच घरात थुंकले होते. मात्र त्यावरून संतप्त होऊन शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले होते, तर अजित पवारांनी संजय राऊत यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. या संयमाच्या सल्ल्यावर संजय राऊत यांनी नाशिक मध्ये प्रत्युत्तर दिले आहे. धरणामध्ये मुतण्यापेक्षा चांगलं, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांना टोला हाणला आहे. त्याच वेळी थुंकण्याच्या मुद्द्यावर माफी मागायला देखील त्यांनी नकार दिला आहे. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. गद्दाराचे नाव घेतल्यानंतर मी माझ्या घरात थुंकलो, असे समर्थन त्यांनी केले आहे. त्याचवेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते आमदार खासदार यांची सूर्याची पिसाळ या नावाने संभावना केली आहे.
संयमाचा सल्ला देणाऱ्या अजित दादांना त्यांनी ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत. पण आम्ही आमचा पक्ष सोडलेला नाही. पक्ष सोडण्याचा विचार देखील आमच्या मनात येत नाही. आमच्यावर संकट आली म्हणून आम्ही डगमगत नाही किंवा भाजपशी सूत जुळवून घेण्याचा विचाराही करत नाही, अशा परखड शब्दांत संजय राऊत यांनी अजित दादांचे वाभाडे काढले आणि ते त्यानंतर त्र्यंबकेश्वरला रवाना झाले.
पण या निमित्ताने एक बाब समोर आली, ती म्हणजे भांडण दोन शिवसेनेचे आहे. राजकीय घमासान ठाकरे विरुद्ध शिंदे असे सुरू आहे. पण मध्येच सल्ला देणार अजित दादा या निमित्ताने संजय राऊत यांच्या टार्गेटवर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App