विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात लोकशाही नाही. भारतात विरोधी पक्षांची मुस्कटदाबी होते आहे. नफरत की दुकान बंद मोहब्बत की दुकान शुरु, वगैरे भाषणांचा राहुल गांधींचा अमेरिका दौरा संपला की त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचा “कृती दौरा” सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा करार होणार आहे, ज्याचे पडसाद खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर उमटणार आहेत.”World is watching… It is a big deal,” US India business body chief ahead of PM Modi’s visit
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भारतामध्ये लोकशाही नसल्याची भाषणे देत आहेत. भारतात विरोधी पक्षांची मुस्कटदाबी होते आहे. काही लोक लोटांगण घालून राजकीय नाटकं करत आहेत. पण मी तसे लोटांगण घालणार नाही, असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची ते खिल्ली उडवत आहेत. राहुल गांधींचा हा अमेरिकेचा “भाषण दौरा” 4 जून पर्यंत चालणार आहे. न्यूयॉर्कमध्ये 4 जून रोजी मोठा मेळाव्यात ते भाषण करतील आणि त्यांचा दौरा संपेल.
त्यानंतर 16 दिवसांच्या गॅपने 22 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका “कृती दौरा” सुरू होणार आहे. अमेरिकेतल्या या दौऱ्यात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत दरम्यान संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा करार होणार आहे, तो म्हणजे भारतातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिकल्स या दोन कंपन्यांचा करार होऊन भारतात फायटर जेट विमानांची इंजिने बनविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भारत हा जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब बनला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने ते अनेक देशांशी करार करत आहेत. यामध्ये फायटर विमानांची इंजिने बनविणे हा अत्यंत महत्त्वाचा करार आहे. त्यामुळे भारत 4 विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. सध्या फक्त अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे चारच देश जेट फायटर इंजिन्स बनवतात. चीनला देखील जेट फायटर इंजिन्स बनविण्यात यश आलेले नाही.
"World is watching… It is a big deal," US India business body chief ahead of PM Modi's visit Read @ANI Story | https://t.co/JQmCHXYx2z#US #India #business #PMModi #visit #Washington pic.twitter.com/RElWt8MXUI — ANI Digital (@ani_digital) June 1, 2023
"World is watching… It is a big deal," US India business body chief ahead of PM Modi's visit
Read @ANI Story | https://t.co/JQmCHXYx2z#US #India #business #PMModi #visit #Washington pic.twitter.com/RElWt8MXUI
— ANI Digital (@ani_digital) June 1, 2023
या पार्श्वभूमीवर भारताच्या मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत जेट इंजिन निर्मितीत एंट्रीने चीनला मागे सारले आहे.
याखेरीस पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात राजनैतिक – सामरिक महत्त्वाचे करार होतील त्यामध्ये एशिया – पॅसिफिक संरक्षण करारही महत्त्वाचा आहे. भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया असा संरक्षण चतुष्कोन मजबूत करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.
राहुल गांधी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात ब्रिटन दौऱ्यामधील मुद्द्यांचेच रिपीटेशन करत आहेत. भारतात लोकशाही नाही. विरोधकांची मुस्कटदाबी होते आहे. भाजप आणि हिंदुत्ववाद्यांनी सरकारी संस्थांवर कब्जा केला आहे. देशातली धर्मनिरपेक्षता लोप पावली आहे, वगैरे आरोप त्यांनी केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा अमेरिकेचा “कृती दौरा” अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App