वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परदेशात नोंदणी असलेल्या ऑनलाईन गेमिंग पोर्टल्सवर ईडीने देशभरात 25 ठिकाणी छापे घालून तब्बल 4000 कोटी रुपयांची हेराफेरी पकडली आहे. 4000 crore fraud by online gaming portals companies
ईडीने 25 ठिकाणी परदेशी नोंदणीकृत ऑनलाइन गेमिंग पोर्टलवर छापे घातले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी सांगितले की विदेशी चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशात कार्यरत असलेल्या परदेशी-नोंदणीकृत ऑनलाइन गेमिंग वेबसाइट आणि कंपन्यांवर अनेक राज्यांमध्ये छापे घातले. यातून सुमारे 4,000 कोटी रुपयांची हेराफेरी पकडली आहे. हे पैसे बेकायदेशीररित्या परदेशात पाठवले गेल्याचे उघडकीस आणले आहे.
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार केलेल्या या कारवाईदरम्यान 55 बँक खाती गोठवली. तसेच 19.55 लाख रुपये आणि $2,695 हून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. 22 – 23 मे रोजी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील 25 परिसरांमध्ये झडती घेण्यात आली. या ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि वेबसाइट्स कुराकाओ, माल्टा आणि सायप्रस सारख्या छोट्या बेटांवर नोंदणीकृत असल्याचे आढळून आल्या. त्या सर्व प्रॉक्सी व्यक्तींच्या नावाने उघडलेल्या भारतीय बँक खात्यांशी जोडलेल्या आढळून आल्या आहेत. या संदर्भात पुढील तपासणी चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App