अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लीम आणि साबीर विरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी!

गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उमेश पाल हत्याकांडातील अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. आता ते देश सोडून परदेशात पळून जाऊ शकत नाहीत. लुकआउट नोटीसचा कालावधी एक वर्षाचा आहे. पोलीस आयुक्तालयाचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता, त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे.  Lookout notice issued against Atiq Ahmeds fugitive wife Shaista Parveen  Guddu Muslim and Sabir

या तिघांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेशशिवाय अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले, मात्र कोणताही सुगावा लागला नाही.गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस असून त्यांची नावे लुकआउट नोटीसमध्ये आहेत. शाइस्ता परवीनवर ५० हजारांचे बक्षीस आहे. लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर आता हे तिघेही देश कुठेही पळून जाऊ शकत नाहीत.

शाईस्ताने अतिकला प्रत्येक गुन्ह्यात दिली साथ –

पोलीस अनेक महिन्यांपासून शाइस्ता परवीनचा शोध घेत होते. अतीक अहमदसोबत लग्न झाल्यापासून शाइस्ताने अतीकला प्रत्येक गुन्ह्यात तितकीच साथ दिली. उमेश पाल खून प्रकरणाच्या वेळी अतिक अहमद अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात बंद होते. त्यावेळी शाइस्ता परवीन बाहेर होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी यूपी पोलीस शाइस्ताचा शोध घेत आहेत.

Lookout notice issued against Atiq Ahmeds fugitive wife Shaista Parveen  Guddu Muslim and Sabir

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात