एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत पाच जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने सांगितले की, राजौरी सेक्टरमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन त्रिनेत्रामध्ये गंभीर जखमी झालेल्या तीन जवानांचा सकाळी दुर्दैवाने मृत्यू झाला. तर पहाटे दोन जवान शहीद झाले. घटनास्थळी लष्कराचे हेलिकॉप्टरही उडताना दिसले आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह आणि एडीजीपी जम्मू मुकेश सिंह घटनास्थळी हजर आहेत. 5 jawans martyred in an encounter with terrorists in Rajouri Jammu and Kashmir
लष्कराच्या उत्तरी कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात जम्मू भागातील भाटा धुरियानच्या टोटा गली भागात लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबवतत होते. याच पार्श्वभूमीवर राजौरी सेक्टरमधील कांडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे 3 मे रोजी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली होती.
याचबरोबर त्यात म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सर्च पार्टीने एका गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला घेरले. आजूबाजूला खडक आणि उंच पर्वतीय भागांनी वेढलेला हा परिसर अतिशय घनदाट वनक्षेत्राचा आहे. जवानांना प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनी स्फोट केला. ज्यामध्ये सैन्य दलातील दोन जवान शहीद झाले असून एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. जखमींना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
J&K | Five soldiers lost their lives in the encounter ongoing in Kandi area of Rajouri. Senior officials have reached the spot. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/3sIKz28Wus — ANI (@ANI) May 5, 2023
J&K | Five soldiers lost their lives in the encounter ongoing in Kandi area of Rajouri. Senior officials have reached the spot.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/3sIKz28Wus
— ANI (@ANI) May 5, 2023
जखमी अधिकारी मेजर दर्जाचे आहेत. जखमींपैकी तीन जवानांचा नंतर मृत्यू झाला. जवळपासच्या भागातून अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. प्राथमिक वृत्तानुसार, या भागात दहशतवाद्यांचा एक गट अडकला आहे. काही दहशतवादी मारले गेल्याचीही शक्यता असून कारवाई सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, PAFF ने पुंछ हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App