एकाच वेळी दोन डगरींवर पाय; पण घसरून पडणार नाही याची खात्री काय??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान मराठी माध्यमातून जे रिपोर्टिंग येत आहे, ते कितीही पवारांच्या चाणक्यगिरीचे महिमामंडन करणारी असले, तरी त्याचे वर्णन “एकाच वेळी दोन डगरींवर पाय पण घसरून पडणार नाही याची खात्री काय??,” याच सवालाने करावे लागेल.Sharad Pawar playing double game in NCP itself

कारण पवार एकाच वेळी आत्मचरित्राच्या पानांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपला “डोळा” मारत आहेत आणि दुसरीकडे आपण आपल्या कन्येला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी बसवताना त्या विरोधात जाणाऱ्या गटाला आपली अधिमान्यता देणार नाही, असेच सूचित करीत आहेत. म्हणजे पवारांनी प्यायले तर “पंचगव्य” बाकीच्यांनी प्यायले तर “गोमूत्र” असा हा पवारांचा पुरोगामी मामला आहे!! पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीशी जवळी करायची होती, असा दावा पवारांनी आत्मचरित्रात केला आहे. त्याच्या पानांमधली “निवडक”, “वेचक” तपशील मराठी माध्यमे प्रसिद्ध करून पवारांना अनुकूल नॅरेटिव्ह चालवत आहेत.

पण पवारांच्या या निवृत्ती नाट्याचे सुरुवातीला फक्त महाराष्ट्रात पडसाद उमटले. पण राष्ट्रीय पातळीवर मात्र ते नाट्य सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी पडसाद उमटले, यातले इंगित मराठी माध्यमांनी लपवून ठेवले. पवारांच्या निवृत्ती नाट्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटले, ते देखील फक्त चौकशीच्या पातळीवर. राहुल गांधी, एम. के. स्टालिन, पिनराई विजयन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केले आणि घटनाक्रमाची माहिती घेतली, अशा बातम्या इंग्रजी माध्यमांनी दिल्या. पण मराठी माध्यमांनी मात्र त्या बातम्यांचे “रूपांतर” पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी राष्ट्रीय नेत्यांनी “विनंती” केली, असे केले.’

या बातमीतल्या राजकीय वस्तुस्थितीकडे मराठी माध्यमांनी काणाडोळा केला, तो म्हणजे पवारांच्या निवृत्तीची दखल राष्ट्रीय पातळीवरच्या फक्त राहुल गांधींनी घेतली. पण बाकीचे दोन नेते तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे प्रादेशिकच नेते आहेत.

अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या पहिल्या फळीतल्या एकाही नेत्याने पवारांच्या निवृत्ती नाट्यावर साधी प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. यामध्ये अर्थातच कधीच कोणत्याही राजकीय घडामोडीवर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला समावेश आहे, तसाच अमित शाह आणि सोनिया गांधींचाही समावेश आहे. या तीनही सर्वात महत्त्वाच्या नेत्यांनी पवारांच्या निवृत्ती नाटकाकडे अद्याप लक्षही दिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ त्यांचे “लक्ष”च नाही, असा अजिबात नाही. पण राष्ट्रीय पातळीवरचे प्रत्यक्ष निर्णायक भूमिका बजावणारे पहिल्या फळीतले नेते पण शरद पवारांना अधिकृत पातळीवर कोणत्या फळीचे नेते म्हणून लेखतात??, याचे हे उत्तम उदाहरण आहे!!

एकाच वेळी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी “एस्टॅब्लिश” करायचे आणि दुसरीकडे अजित पवारांना त्यांच्या “वैयक्तिक अडचणी” सोडविण्यासाठी भाजपशी साटेलोटे करायची मोकळी द्यायची, अशी पवारांची दोन डगरींवर उभे राहण्याची खेळी आहे. पण ती यशस्वी होईलच याची कोण खात्री देणार??, ही खात्री देणे खरंच पवारांच्या हातात आहे??, हे कळीचे सवाल आहेत आणि या सवालांची खरी उत्तरे देणारे अद्याप गप्प आहेत!!

Sharad Pawar playing double game in NCP itself

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात