प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चोंबडेगिरी बंद करावी. त्यांनी लक्षात ठेवावे की ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांसमोर केली. काँग्रेस पक्षातील निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे घेत नसून राहुल गांधी घेतात, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले होते. त्यावर बोलताना पटोले यांनी संजय राऊत यांनी चोंबडेगिरी करू नये, असे सुनावले.Sanjay Raut should stop Speaking You are not our spokesperson, Nana Patole’s criticism
पटोले पुढे म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी पुस्तकात काही लिहिले असले तरी त्यावर सध्या प्रतिक्रिया देणार नाही. मात्र योग्य वेळी यावर उत्तर देऊ. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार सुलतानी कायदे आणत असल्याबाबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देऊन राज्य सरकारने उपकार केले नाहीत. या कार्यक्रमात अनेकांचे बळी गेले. त्यावर तातडीने अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांना केली. तसेच छत्तीसगडमध्ये आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. महाराष्ट्रातसुद्धा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ निकाली काढला पाहिजे, असेही या वेळी नाना पटोले यांनी म्हटले.
अजित पवारांनीही राऊतांना फटकारले
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना फटकारले होते. दुसऱ्या पक्षाची वकिली करू नका, असे म्हणत अजित पवार यांनी संजय राऊतांना फैलावर घेतले होते. त्यानंतर राऊत मवाळ होत ते गोड व्यक्ती असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पटोले यांनीदेखील राऊत यांना चांगलेच झापले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App