‘’…अन् शिक्षण आणि हिजाब यांच्यातील संघर्षात तिने शिक्षणाची निवड केली’’ – कर्नाटकातील परीक्षेत टॉपर ठरलेल्या तबस्सुम कहानी!

‘’मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काही त्याग तर करावेच लागतात. ’’, असंही तिने म्हटले आहे. जाणून घ्या तिच्या पालकांची काय होती भूमिका?

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : ‘सरकारच्या आदेशाने माझाही गोंधळ उडाला होता. मी द्विधा मनस्थितीत होते. कारण धर्मही आवश्यक होता आणि शिक्षणही. आता मला शाळेत शिकायचे असेल तर मला हिजाब सोडावा लागेल. मी हिजाब घातला तर मी शाळेत जाऊ शकत नव्हते. पण मला कळत होतं काय करायचं? मी माझ्या भविष्यासाठी स्पष्ट होते’  कर्नाटक बोर्डाच्या परीक्षेत टॉपर ठरलेल्या तबस्सुम शेख हिचे हे म्हणणे आहे. the conflict between education and hijab she chose education Story of Tabassum Shekh who became the topper in the Karnataka exam

कर्नाटक सरकारने शाळेत हिजाब घालण्यावर बंदी घातली तेव्हा मोठा गदारोळ झाला होता. मुलींनी शाळेत जाणे बंद केले, शिक्षण थांबले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. मात्र त्याचवेळी धर्म आणि शिक्षण यात तबस्सुमने शिक्षणाची निवड केली होतई आणि ती शाळेत जाऊ लागली. याचाच परिणाम म्हणजे नगररत्नम्मा मेदा कस्तुरीरंगा शेट्टी नॅशनल स्कूल (NMKRV) ची विद्यार्थिनी तबस्सुम आज टॉपर आहे. तिने कर्नाटक पूर्व-विद्यापीठ शिक्षण विभागाने दुसऱ्या पीयूसी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले. तबस्सुमला ६०० पैकी ५९३ गुण मिळाले आहेत.

सरकारचा निर्णय मान्य केला –

तबस्सुमही हिजाब घालून तिच्या वर्गात जात असे. मात्र निकालानंतर तिने हिजाब सोडून शिक्षणाला महत्त्व दिले. कर्नाटकात पीयूसीमध्ये हिजाब बंदीनंतर बराच गदारोळ झाला होता. यावरून राजकारणही झाले. तो काळ आठवून टॉपर विद्यार्थिनी म्हणाली की, ती खूप काळजीत पडली होती. शाळेत एकच गोंधळ उडाला, अराजकाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती होती. दरम्यान उडुपी येथील सरकारी शाळेतील सहा विद्यार्थिनींनी दावा केला की, त्यांना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश दिला जात नाही. यानंतर राज्यभर निदर्शने झाली. विद्यार्थी केवळ गणवेश घालूनच शाळा-कॉलेजमध्ये येतील, असा आदेश राज्य सरकारने काढला.

काही त्याग तर करावेच लागतील –

इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, तबस्सुमला फक्त तिच्या अभ्यासाची काळजी वाटत होती. कारण या सर्वात अभ्यासाचे सर्वाधिक नुकसान होत होते. तबस्सुमच्या अनेक मैत्रिणी हिजाबवर बंदी नसलेल्या इतर महाविद्यालयांध्ये गेल्या. तर काहीजणी ओपन स्कूलिंगकडे वळल्या होत्या. तबस्सुम म्हणाल, शिक्षण आणि हिजाब यांच्या लढाईत मी शिक्षणाची निवड केली. मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काहीतरी त्याग करावाच लागतो.

पालकांनी मुलाला साथ दिली –

मुलीचे वडील अब्दुल खौम शेख हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी आपल्या मुलीवर कधीही बंधने लादली नाहीत. सरकारचा आदेश आल्यावर देशाच्या कायद्याचे पालन करू, असे ते म्हणाले, कारण मुलांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. सरकारी आदेशानंतर तबस्सुम घरातून हिजाब घालायची पण शाळेच्या आवारात प्रवेश करताना तो काढून टाकायची. शाळेत एक खोली बनवली होती जिथे तुम्ही तुमचा हिजाब आरामात बदलू शकता. शुक्रवारी जेव्हा ती तिच्या शिक्षकांना भेटायला गेली तेव्हा तिने हिजाब घातलेला होता पण कोणी काही बोलले नाही.

the conflict between education and hijab she chose education Story of Tabassum Shekh who became the topper in the Karnataka exam

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात