‘न्यायालयाचा निकाल गांधी कुटुंबाच्या तोंडावर चपराक’ – सुरत कोर्टाच्या दणक्यानंतर भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

BJP Sambit Patra Criticized Rahul Gandhi Over His Hindutwa Comment

‘आज आलेला निर्णय हा केवळ देशातील जनतेच्या विजयाचा उत्सव नाही, तर न्यायव्यवस्थेचाही विजयाचा उत्सव आहे. असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांना आज सुरत कोर्टातून झटका बसल्यानंतर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानंतर  भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींवर हल्लाबोल केला. The verdict of the court is a slap on the face of the Gandhi family BJPs attack on Rahul Gandhi

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले “सुरत न्यायालयाच्या निर्णयामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. ज्या मागासवर्गीयांसाठी राहुल गांधींनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते, त्यांना शिवीगाळ केली होती आणि हे सर्व करून गांधी कुटुंबाला वाटले होते की, ते यातून निसटम्यात यशस्वी होतील, परंतु तसे झाले नाही. न्यायालयाचा निर्णय म्हणजे गांधी परिवाराच्या तोंडावर चपराक आहे. सुरत न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने कायदा सर्वांसाठी समान असल्याचे सिद्ध होते.”

संबित पात्रा म्हणाले- “राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मधूनमधून न्यायव्यवस्थेवर हल्ले करत होते. केवळ भारतच नाही तर इतर देशांतूनही भारताविरोधात वक्तव्ये करण्याचे काम काँग्रेसचे कार्यकर्ते करत होते. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधात इको सिस्टीम उभी करण्यात आली होती.

हा निर्णय म्हणजे न्यायव्यवस्थेचा विजय  –

याशिवाय संबित पात्रा म्हणाले ‘आज आलेला निर्णय हा केवळ देशातील जनतेच्या विजयाचा उत्सव नाही, तर मागासवर्गीयांच्या विजयाचा उत्सव आहे, तसाच तो न्यायव्यवस्थेचाही विजय आहे, कारण ज्या न्यायव्यवस्थेविरोधात रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत होता, आज त्याच न्यायपालिकेने म्हटले की तुम्ही कितीही दबावाचे राजकारण आमच्यावर करण्याचा प्रयत्न केल तरी न्यायपालिका झुकत नाही.

The verdict of the court is a slap on the face of the Gandhi family BJPs attack on Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात