अबकारी घोटाळ्यातील आरोपी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारमधील माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत आज १४ दिवसांची वाढ झाली आहे. राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १ मे पर्यंत वाढ केली आहे. Rouse Avenue Court extends the judicial custody of Delhis former Deputy Chief Minister Manish Sisodia till May 1
वृत्तसंस्था ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या नवीन मद्य धोरणातील कथित अनियमिततेबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोंदवलेल्या प्रकरणात मनीष सिसोदियांच्या कोठडीत वाढ करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासोबतच सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यातही न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत १ मे पर्यंत वाढ केली आहे.
मनीष सिसोदिया यांच्यासह अबकारी घोटाळ्यातील आरोपी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात राऊज अव्हेन्यू कोर्टाने अरुण पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीत २९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
The Court also extended Manish Sisodia's judicial custody till May 1, in CBI case as well. — ANI (@ANI) April 17, 2023
The Court also extended Manish Sisodia's judicial custody till May 1, in CBI case as well.
— ANI (@ANI) April 17, 2023
ईडी प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी अबकारी धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App