वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प सध्या एका खटल्याला सामोरे जात आहेत. त्याचवेळी एका कागदपत्रात त्यांच्या उत्पन्नाबाबत मोठा खुलासा झाला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात किती कमाई केली हे तुम्हाला माहिती आहे का? एका फेडरल दस्तऐवजात असा दावा करण्यात आला आहे की ट्रम्प यांचे व्यावसायिक साम्राज्य किमान 1.2 अब्ज डॉलर्स इतके आहे.Donald Trump’s gross earnings from social media, federal documents reveal
अध्यक्षीय कार्यकाळात झाली एवढी कमाई
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यावसायिक साम्राज्य किमान 1.2 अब्ज डॉलर्स आहे, असा दावा फेडरल डॉक्युमेंटमध्ये करण्यात आला आहे. या दस्तऐवजातून समोर आले आहे की ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळात डिजिटल ट्रेडिंग कार्डसारख्या उपक्रमातून भरपूर पैसा कमावला. 2021 आणि 2022 या वर्षांमध्ये ट्रम्प यांनी किमान 282 मिलियन डॉर्स कमावले.
फेडरल इलेक्शन कमिशनकडे दाखल करण्यात आलेल्या 101 पानांच्या आर्थिक प्रकटीकरण अहवालात हे दाखवण्यात आले आहे. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुतेक होल्डिंग्ज ‘इलिक्विड रिअल इस्टेट’ मध्ये असल्याने नेमकी आकडेवारी सांगता येत नाही. ब्लूमबर्गच्या अहवालात याला दुजोरा देण्यात आला आहे.
गोल्फ क्लबसह 19 मालमत्ता
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हर्जिनिया आणि टर्नबेरी, स्कॉटलंडमधील गोल्फ क्लबसह 19 मालमत्तांची किंमत 50 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी डिजिटल ट्रेडिंग कार्डच्या विक्रीतून 1 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. या कार्ड्सवर ट्रम्प यांची सुपरहिरोच्या रूपात कार्टून चित्रे छापलेली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटरसारख्या सोशल वेबसाइटमध्ये त्यांची होल्डिंग्ज 25 दशलक्ष ते 50 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. त्यांच्याकडे कंपनीची 90% मालकी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यात अशा लोकांचा खुलासा केलेला नाही, ज्यांनी त्यांना स्पीकिंग फीसमध्ये 5 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App