प्रतिनिधी
हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येण्याच्या काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या प्रयत्नांदरम्यान भारत राष्ट्र समिती (BRS) ने केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.Amid opposition unity efforts, KCR staked his claim on the post of Prime Minister, saying – the next government at the Center will be of BRS
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त देशातील सर्वात उंच (125 फूट) बाबा साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, 2024च्या लोकसभेनंतर केंद्रात बीआरएस सरकार स्थापन करेल.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्याचा संकल्प केला होता. अशा वेळी केसीआर यांचे हे वक्तव्य आले आहे.
नितीशकुमार यांनी घेतली या नेत्यांची भेट
नितीश कुमार यांनी आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा आणि सीपीआय(एम) नेते सीताराम येचुरी यांचीही भेट घेतली. केसीआर यांच्याशी बोलण्याची जबाबदारी तेजस्वी यांच्याकडे देण्यात आली आहे. अशा स्थितीत केसीआर यांचे हे विधान विरोधी एकजुटीच्या मार्गातील आव्हान ठरत आहे.
जाहीर सभेत समर्थकांचा उत्साह पाहून केसीआर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पुढचे सरकार आमचेच बनणार आहे. माझा हा दावा आमच्या विरोधी पक्षांच्या पचनी पडणार नाही, पण प्रकाशासाठी एक ठिणगी पुरेशी आहे, असेही ते म्हणाले.
“बीआरएसला महाराष्ट्रात मोठा पाठिंबा”
केसीआर म्हणाले की, महाराष्ट्रात बीआरएसला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांना बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातूनही अशाच सहकार्याची अपेक्षा आहे.
जुने दिवस आठवत त्यांनी सांगितले की, 2014 मध्ये जेव्हा ते दिल्लीला निघाले होते, तेव्हा त्यांनी आंध्र प्रदेश सोडून तेलंगणाला परतणार असल्याचे सांगितले होते. देशातील पुढचे सरकार आमचेच असेल, हे मी त्याच आत्मविश्वासाने सांगत आहे.
केसीआर यांनी मात्र केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशी संख्या कोठून मिळेल हे सांगितले नाही, परंतु एक पाऊल पुढे जाऊन त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास देशभरात ‘दलित बंधू योजना’ लागू करण्याचे आश्वासन दिले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी तेलंगणा सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याची सुरुवात 2021 मध्ये झाली. या अंतर्गत अनुसूचित जातीच्या कुटुंबांना उद्योग सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये 100 टक्के अनुदान म्हणून दिले जातात. ही रक्कम परत करण्याची गरज नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App