
मुख्यमंत्री बोम्मई यांना म्हटले ‘मामा’, प्रकाश राज यांनी व्यक्त केली नाराजी
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दाक्षणित्य चित्रपट स्टार किच्चा सुदीप भाजपमध्ये दाखल झाल्याची बातमी आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. Karnataka Assembly Actor Kiccha Sudeep will campaign for BJP
त्याचवेळी अभिनेता प्रकाश राज यांनी किच्चा सुदीप यांच्या भूमिकेवरर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट केले की, सुदीपच्या वक्तव्यामुळे मला राग आणि आश्चर्य दोन्ही वाटत आहे. ते म्हणाले की, सुदीपचे हे वक्तव्य धक्कादायक आहे. हा भाजपचा डाव आहे, पराभवाच्या भीतीने अशा फेक न्यूजला हवा दिली आहे. किच्चा सुदीप एक समंजस व्यक्ती आहे, तो अशी चूक करणार नाही.
आज सुदीप कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. यादरम्यान तो म्हणाला होता की, मला मदत करणारे अनेक लोक होते. त्यापैकी एक म्हणजे सीएम बोम्मई. आज मी पक्षासोबत नाही तर त्यांच्यासोबत आहे. मी सीएम बोम्मई यांना सांगितले आहे की मी त्यांच्यासाठी भाजपचा प्रचार करण्यास तयार आहे.
As an Indian, I am very proud of the development. There is a lot of good that has happened in the country and I totally respect certain decisions of Prime Minister Modi.
Shri @KicchaSudeep, Renowned Actor#BJPYeBharavase pic.twitter.com/oEW2bFTwaU
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) April 5, 2023
त्याचवेळी सीएम बोम्मई म्हणाले की, सुदीप माझा खूप चांगला मित्र आहे. ही गोष्ट तुम्हा सर्वांना माहीत आहे. ज्यावर किच्चा म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना मामा म्हणतो. अशावेळी हे माझे कर्तव्य आहे की, जेव्हा जेव्हा तो मला बोलावतील तेव्हा मी माझा पाठिंबा देण्यासाठी पोहोचावे. तसेच, एक भारतीय म्हणून मला या विकासाचा खूप अभिमान आहे. देशात खूप चांगले घडले आहे आणि मी पंतप्रधान मोदींच्या काही निर्णयांचा पूर्ण आदर करतो. असंही यावेळी सुदीप यांनी बोलून दाखवले.
Karnataka Assembly Election Actor Kiccha Sudeep will campaign for BJP
महत्वाच्या बातम्या
- सावरकर गौरव यात्रा : मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही घुसेगा; देवेंद्र फडणवीसांचा प्रहार–
- ‘’उद्धव ठाकरे… फडतूस नही काडतूस हू मै, झुकेंगा नही साला घुसेंगा’’ देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा!
- Covid19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत करोना संसर्गाचे ७११ नवीन रुग्ण, चार जणांचा मृत्यू
- China Arunachal rename: चीनकडून कुरापती सुरूच; आता अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली!