वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देण्याच्या आरोपावरून अडचणीत आले आहेत. संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात ते दाखल झाले होते. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात त्यांना अटक करण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांना 1.22 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. हे पैसे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला दिले जाणार आहेत.34 charges against Donald Trump, fined in the porn star case, what was the punishment? Read more…
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या सुनावणीदरम्यान तीन उदाहरणे देण्यात आली. पहिले ट्रम्प टॉवरच्या दरबानाला 30,000 डॉलर, महिलेला 1,50,000 डॉलर आणि पॉर्न स्टारला 1,30,000 डॉलर भरपाई देण्याचे सांगितले. त्याचवेळी, न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकन न्यायाधीशांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्याविरुद्धचा खटला जानेवारी 2024 पासून सुरू होऊ शकतो.
कडेकोट बंदोबस्तात सुनावणी पार पडली
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये हजर झाल्यानंतर फ्लोरिडाला परतले. कडेकोट बंदोबस्तात ट्रम्प न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर झाले होते. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 35,000 हून अधिक पोलिस आणि गुप्तहेर सज्ज होते. मात्र, आरोप सांगून त्यांना सोडून देण्यात आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प 8 कारच्या ताफ्यासह कोर्टात पोहोचले होते.
ट्रम्प यांनी कोर्टात काय म्हटले?
भारतीय वेळेनुसार रात्री 12.45च्या सुमारास ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर झाले. यावेळी न्यायाधीशांनी ग्रँड ज्युरींनी केलेले आरोप सीलबंद लिफाफ्यात त्यांच्याकडे सुपूर्द केले. ट्रम्प यांना स्टॉर्मी डॅनियलला 1,22,000 डॉलर नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी न्यायालयाला सांगितले की, ते निर्दोष आहेत आणि 34 प्रकरणांमध्ये त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App