विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर मध्ये कालच्या वज्रमूठ सभेतले उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकले आणि जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या एका वक्तव्याची आठवण झाली. उद्धव ठाकरे आणि डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्या विशिष्ट वक्तव्यांमध्ये जबरदस्त साम्य आढळले!! कारण हेच ते दोन नेते आहेत, ज्यांनी कायम परस्परविरोधी राजकारण करूनही एका विशिष्ट टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. आणि या त्यांच्या आव्हानांमध्येच विलक्षण साम्य आहे!!Dr. Farooq Abdullah challenged PM Narendra modi to abolish article 370, modi did it!!; Uddhav Thackeray challenges him to fulfill dream of Savarkar’s akhand Hindusthan, when will he fulfill it??
आठवते का??, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. फारूक अब्दुल्ला काय म्हणाले होते??,… ते म्हणाले होते ना… बघू या कोण माई का लाल इकडे येऊन 370 कलम हटवतो ते??… मी पण पाहतो. इन्शाल्ला हम मुकाबला करेंगे. चाहे तो हम आजाद होंगे!!, अशी धमकीभरी भाषा डॉ. फारुख अब्दुल्लांनी वापरली होती ना!!
त्यावेळी त्यांचे वक्तव्य प्रचंड व्हायरल झाले होते. लोकसभेची निवडणूक व्हायची होती. निवडणुकीत प्रचार जोरदार झाला. आव्हाने प्रतिआव्हाने दिली गेली. 2019 च्या निवडणुकांचे निकाल लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पेक्षा अधिक मोठा जनमताचा कौल घेऊन सत्तारूढ झाले आणि 2019 च्या पहिल्याच संसद अधिवेशनात जम्मू – काश्मीर मधले 370 कलम मोदी सरकारने रद्द करून टाकले!!… बघतोच मी कोण इथे येऊन 370 कलम हटवतो ते!!, या फारूक अब्दुल्लांच्या वक्तव्याचे पुढे काय झाले?? ते नंतर काही बोललेले आठवतेय का?? ते बोलले बरेच असतील पण आता आठवते ते फक्त त्यांचे, बघतोच मी, कोण माईचा लाल इथे येऊन 370 कलम हटवतो ते??, हे आव्हान!! आणि त्यानंतर इतिहासजमा झालेले 370 कलम!!
पण हा सगळ्या घटनाक्रम आत्ता आठवायचे कारण असे, की काल छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मोदींना असेच आव्हान दिले आहे. सावरकर गौरव यात्रा काढताय ना, मग त्यांना भारतरत्न द्यायची हिंमत तरी दाखवा!! अमित शहा म्हणालेच होते ना, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवायची आहे. होय, मलाही जमीन पाहायचीच आहे. पण ती महाराष्ट्रातली नव्हे, तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन पाहायची आहे. तुम्ही सावरकरांचे नाव घेता ना. मग सावरकरांचे जे स्वप्न होते, आसिंधू सिंधू पर्यंता म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत अखंड हिंदुस्थान…!!, ते तरी पूर्ण करून दाखवा. मग मानू तुमचे हिंदुत्व!!, असे तडाखेबंद आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना 370 कलम हटवून दाखवण्याचे आव्हान दिले होते. ते मोदींनी निवडणुकीनंतर लगेच पूर्ण करून टाकले. आता देखील उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचे स्वप्न म्हणून पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवायचे आव्हान दिले आहे. त्याचा मुहूर्त देखील त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा धरला आहे. मग मोदी सावरकरांचे नाव घेऊन आणि त्यांना भारतरत्न देऊन 2024 नंतर पाकव्याप्त काश्मीर जिंकून घेण्याचे स्वप्न पूर्ण करतील?? सावरकरांच्या अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य ते आपल्याकडे कर्तृत्वाने खेचून घेतील??, हा मोदींसाठी प्रतिष्ठेचा आणि भाग्याचा मुद्दा आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App