वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी सोमवारी सुरत न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. पक्षाची कायदेशीर टीम गुजरातमध्ये पोहोचली आहे. सुरत सत्र न्यायालयात उच्च न्यायालयासमोर अपील करण्यात येणार आहे.Rahul Gandhi to appeal in Surat session court tomorrow in defamation case, appearance in Patna court in another case
जामीन मिळणे किंवा तुरुंगात जाणे यावर पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे बोलले जाते. अखेर ही लढाई राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही क्षेत्रांत लढायची, असे ठरले आहे. मात्र, निकालाचे गुजरातीमधून इंग्रजीत भाषांतर करण्यास वेळ लागल्याचे कारण देत पक्षाने उशीर केला.
राहुल गांधी त्यांच्या कायदेशीर टीमवर नाराज
या निकालाला आव्हान द्यायचे की त्याचे पालन करण्यासाठी तुरुंगात जावे, या मुद्द्यावरून पक्षनेतृत्वातही फूट पडली. तुरुंगात गेल्याने सहानुभूतीची लाट निर्माण होईल, असे एक मत आहे. दुसरे म्हणजे आव्हान न देणे म्हणजे चूक मान्य करणे असे मानले जाईल. अंतिम निर्णय सोनिया गांधींवर सोपवला होता. चार वर्षांपासून सुरू असलेला हा खटला गांभीर्याने न लढवणाऱ्या आपल्या कायदेशीर टीमवरही राहुल गांधी नाराज असल्याचे बोलले जात आहे.
पाटणा न्यायालयातही हजर राहणार
आणखी एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना 12 एप्रिलला पाटणा न्यायालयात हजर राहायचे आहे. राहुल यांनी मोदी आडनाव असलेल्यांना चोर म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. राहुल गांधींवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये मानहानीचे 5 गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणात सुरत न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App