वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोना विषाणूने अवघ्या जगाला हादरवल्यानंतर आता अमेरिकेत नव्या विषाणूची चर्चा आहे. येथे पुन्हा एकदा एका नवीन धोकादायक व्हायरसबाबत सतर्क करण्यात आले आहे. हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. जी शरीरात खूप वेगाने पसरते. सीडीसी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटले आहे की हा आजार खूप वेगाने पसरत आहे. या वेगाने पसरल्यास तो लवकरच संपूर्ण देशाला आपल्या ताब्यात घेऊ शकतो.In America, dangerous Candida auris virus infection, every third patient dies
सीडीसीच्या अहवालात असे म्हटले आहे की, या घातक बुरशीजन्य संसर्गावर उपचार करणे खूप कठीण आहे. त्याहूनही चिंतेची बाब म्हणजे अतिशय वेगाने लोक यामुळे संक्रमित होत आहेत. 2021 मध्ये, अमेरिकेत 756 रुग्णांवरून 1471 रुग्णांपर्यंत संख्या वाढली. जी दुप्पट आहे. कॅन्डिडा ऑरिस असे या विषाणूचे नाव आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये यासंदर्भात आणखी एक वृत्त देण्यात आले आहे. यानुसार, 2022 मध्ये या बुरशीजन्य संसर्गाने 2377 लोकांना संक्रमित केले आहे.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना जास्त लागण
यासंदर्भात ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या कोरोनाच्या वेळीही आल्या होत्या. जसे कोरोना विषाणूबद्दल सांगितले होते की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, हा विषाणू त्यांच्यावर जास्त परिणाम करतो. त्याच पद्धतीने याबाबतही बोलले जात आहे. एका रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे किंवा जे एखाद्या आजाराने ग्रस्त आहे, तेव्हा हा संसर्ग प्रथम त्याच्या शरीरात प्रवेश करत आहे. निरोगी मानवी शरीरात त्याचा एवढा त्रास होत नाही. जे रुग्ण व्हेंटिलेटरवर असतात किंवा त्याला गंभीर आजार असतो, त्यांच्यावर त्याचा सर्वात आधी परिणाम होतो.
WHO ने दिला इशारा
आतापर्यंत या विषाणूबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु मृत्यूचे प्रमाण 60 टक्के आहे. रुग्णांना हॉस्पिटल आणि केअर होममध्ये दाखल करण्यात येत आहे. सीडीसी एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. मेघन लिमन म्हणतात की, तीनपैकी एक जण मरत आहेत. हे खूप धोकादायक आहे. त्याचा थेट परिणाम शरीराच्या कोणत्या भागावर होतो हे सध्या स्पष्ट नाही. 2016 मध्ये पहिल्यांदा हा विषाणू अमेरिकेत आढळला होता, मात्र त्यानंतर कोणतीही माहिती मिळाली नाही. 2020-21 मध्ये झपाट्याने पसरला आहे. 2022 मध्ये त्याचे रुग्ण अधिक वेगाने पसरले. WHO नेही याबाबत सतर्क केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App