सरकारने ६०० मदरसे आधीच बंद केले आहेत, अशी माहितीही दिली.
प्रतिनिधी
गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी सांगितले की ते त्यांच्या राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचा विचार करत आहेत. कर्नाटकातील बेळगावी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना हिमंता बिस्वा यांनी सांगितले की त्यांच्या सरकारने ६०० मदरसे आधीच बंद केले आहेत आणि उर्वरित सर्व लवकरच बंद होतील. “आम्हाला मदरसे नको, आम्हाला इंजिनीअर आणि डॉक्टर हवे आहेत.” असंही ते म्हणाले. I have closed 600 madrassas and I intend to close all madrassas because we do not want madrassas. Assam CM Himanta Biswa Sarma
या निर्णयामागील हेतूबद्दल एका पत्रकाराने विचारले असता, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की ‘’ बांगलादेशातील लोक आसाममध्ये येतात आणि आपल्या सभ्यता आणि संस्कृतीला धोका निर्माण करतात. नवीन भारताला शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांची गरज आहे, मदरशांची नाही. नव्या भारताला मदरसे नकोत, विद्यापीठे, शाळा आणि महाविद्यालये हवीत.”
Money Laundering Case : आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदीयांच्या ‘ईडी’कोठडीत पाच दिवसांची वाढ
यापूर्वीही हिमंता बिस्वा सरमा यांनी अनेकदा मदरशांची संख्या कमी करण्याचा किंवा तेथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा आढावा घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. आसाममध्ये सध्या ३ हजार नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत मदरसे आहेत.
Karnataka | People from Bangladesh come to Assam & create a threat to our civilization & culture. I have closed 600 madrassas & I intend to close all madrassas because we do not want madrassas. We want schools, colleges & universities: Assam CM Himanta Biswa Sarma, in Belagavi pic.twitter.com/aIqASZD2a0 — ANI (@ANI) March 16, 2023
Karnataka | People from Bangladesh come to Assam & create a threat to our civilization & culture. I have closed 600 madrassas & I intend to close all madrassas because we do not want madrassas. We want schools, colleges & universities: Assam CM Himanta Biswa Sarma, in Belagavi pic.twitter.com/aIqASZD2a0
— ANI (@ANI) March 16, 2023
२०२० मध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी एक कायदा आणला होता, ज्याद्वारे सर्व सरकारी मदरशांना ‘नियमित शाळा’ मध्ये रूपांतरित केले जाईल. मुख्यमंत्री बिस्वा यांचे म्हणणे होते की, मदरशांमध्ये चांगले वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य पोलीस अशा बंगाली मुस्लिमांसोबत मिळून काम करत आहेत, ज्यांचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मदरशांमध्ये विज्ञान आणि गणित हे विषयही शिकवले जातील. शिक्षणाच्या अधिकाराचा आदर केला जाईल आणि शिक्षकांची माहिती ठेवली जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App