वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (17 मार्च) दिल्लीत होत आहे. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होऊ शकतो. येत्या काही महिन्यांत कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.Congress Central Election Committee meeting in Delhi today, likely to announce the first list of candidates for the Karnataka elections
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उमेदवारांची पहिली यादी 18 मार्च रोजी जाहीर होऊ शकते. तत्पूर्वी, कर्नाटक निवडणुकीतील तिकीट वाटपाबाबत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची राज्यातील विजयपुरा येथे बैठक झाली.
राहुल यांच्या रॅलीत पहिल्या यादीची घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या कर्नाटक दौऱ्यापूर्वी पक्ष सुमारे 120 उमेदवारांच्या नावांची घोषणा करू शकतो. राहुल गांधी 20 मार्चला कर्नाटकात पोहोचणार आहेत. राज्यातील बेळगावी येथे होणाऱ्या पक्षाच्या मेगा मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला कर्नाटकमधील प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याही उपस्थित राहणार आहेत.
याआधी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला, पक्षाच्या निवडणूक तिकीट छाननी समितीचे अध्यक्ष मोहन प्रकाश, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या 9 मार्च रोजी विजयपुरा येथे झालेल्या बैठकीला उपस्थित होते..
डीके शिवकुमार यांच्या भावाला उमेदवारीची शक्यता
डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांचेही नाव काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत येऊ शकते. डीके सुरेश हे सध्या राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार आहेत. जेडीएस नेते कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी यांच्याविरुद्ध ते रामनगरा विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी याबाबत माहिती दिली होती.
आपल्या भावाच्या निवडणूक लढवण्याबद्दल डीके शिवकुमार म्हणाले होते, “मी ते नाकारू शकत नाही, पण हो, एक प्रस्ताव आहे. मला अजून सर्वांशी चर्चा करायची आहे. मला वाटते की त्यांनी निवडणूक लढवावी. स्थानिक नेते माझ्यावर दबाव आणत आहेत आणि सुरेश यांनी निवडणूक लढवावी, असे पक्षाचे म्हणणे आहे. याबाबत मी अद्याप सुरेश किंवा कार्यकर्त्यांशी बोललो नाही. हा एक मोठा निर्णय आहे, परंतु अद्याप तसे झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App