रितेश अग्रवाल : सर्वांत तरुण स्वयं – निर्मित अब्जाधीश बिझनेसमन!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : असे म्हणतात की बिझनेस मॅन व्हायचं असेल तर आपल्याला आवडणारी वस्तू विकण्यापेक्षा बाजारात कोणती वस्तू विकली जाईल यावरती फोकस करावा. तरच तुमचा बिजनेस सक्सेसफुल होऊ शकतो. हेच धोरण धरून रितेश अग्रवाल याने oyo हॉटेल रूम्स एप्लीकेशन सुरू केले. Ritesh Agarwal: Youngest Self-Made Billionaire Businessman!!

रितेश अग्रवाल क्रियेटर ऑफ ओयो रूम्स याचा सध्याच विवाह झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी भेट दिल्याने तो चर्चेत आला आहे. गीतांश सूद हिच्याशी त्याचे लग्न झाले आहे. या मिस्टरी गर्ल बद्दल फारशी माहिती नाही. रितेश हा भारतातील हॉटेल रूम एग्रीगेटर ओयो रूम्स हे एप्लिकेशन तयार करण्यासाठी ओळखला जातो. त्याची कंपनी आता परवडणाऱ्या खोल्या भाड्याने देण्यासाठी देशातील आघाडीचे व्यासपीठ ठरली आहे.

ओडिसातील बिसम या गावात मारवाडी कुटुंबात रितेशचा जन्म झाला. त्याचे कुटुंब ओडिसातील रायगडा जिल्ह्यात एक छोटेसे दुकान चालवायचे. city’s Sacred Heart School मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्याने कोटा राजस्थानी येथे IIT-JEE साठी तयारी केली. 2011 मध्ये तो कॉलेज साठी दिल्लीला गेला. व तिथूनच बाहेर पडताना. यंगएज मध्ये त्याचा व्यवसाय डेव्हलप करायचं ठरवले.

2012 मध्ये त्यांनी Oravel stays ही कंपनी सुरू केली. सप्टेंबर 2012 मध्ये त्यांना व्हेंचर नर्सरी, एक एक्सलेटर प्रोग्रॅम कडून 30 लाख रुपये मिळाले. 2012 मध्ये तो थियेल फेलोशिप प्रोग्रॅमचा विजेता बनला. रितेश हा सन्मान जिंकणारा पहिला भारतीय ठरला. पुढे त्याला एक लाख डॉलर्सचे अनुदान मिळाले. जे त्यांनी मे 2013 मध्ये Oyo रूम्स उभारण्यासाठी वापरले. आपल्याला ओडिसात घरी बोलवतील या भीतीने त्यांनी कुटुंबीयांकडे कधीच पैसे न मागता स्वतः संघर्ष पुढे चालत राहिला.

त्याच्या एप्लीकेशनच्या विकासात हातभार लावण्यासाठी त्यांनी गुगल द्वारा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट देखील शिकले. याच प्रकल्पाचा संशोधनासाठी तो देशभर फिरला. बजेट हॉटेलमध्ये राहून ग्राहकांना येणाऱ्या अडचणी तो जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागला. ओयो हे रनवे यशस्वी ठरले. 2018 पर्यंत तो त्याच्या कंपनीसाठी एक अब्ज डॉलर उभारण्यात यशस्वी झाला. 2020 मध्ये त्याची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्स (सुमारे 8,200 कोटी रुपये) होती. फेब्रुवारी 2020 मध्ये तो जगातील सर्वात तरुण स्वयं-निर्मित अब्जाधीश बनला. आतापर्यंत तो फक्त 29 वर्षाचा आहे.

Ritesh Agarwal: Youngest Self-Made Billionaire Businessman!!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात