Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार

INDIA AFGANISTANN

भारत आणि मध्य आशियाई देशांच्या संयुक्त कार्यकारी समूहाच्या झालेल्या पहिल्या बैठकीत झाली घोषणा

प्रतिनिधी

दिल्लीत मंगळवारी अफगाणिस्तानवर भारत आणि मध्य आशियाई देशांच्या संयुक्त कार्यकारी समूहाच्या झालेल्या पहिल्या बैठकीत भारताने चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानला तब्बल २० हजार मेट्रीक टन गहू पाठवणार असल्याच जाहीर केले. या बैठकीत युद्धामुळे उध्वस्त अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. India announces supply of 20000 MTs of wheat assistance to Afghanistan

भारत आणि पाच मध्य आशियाई देशांनी म्हटले की, अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांसाठी झाला नाही पाहिजे. या सर्व देशांनी काबुलमध्ये योग्यरित्या सर्वसमावेश अशी राजकीय संचरना तयार करण्यावर जोर दिला, जी महिलांसाह सर्व अफगाणीच्या हक्कांचा आदर करेल.


बांग्लादेश : ढाकामध्ये भीषण स्फोटात १४ ठार; १०० हून अधिक जखमी, इमारतीला आग


याशिवाय एका संयुक्त निवदेनात  सांगण्यात आले की, बैठकीत सर्वसमावेश आणि प्रातिनिधिक राजकीय रचना तयार करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. जी सर्व अफगाणी अधिकारांचा सन्मान करेल आणि शिक्षण, महिला, तरुणी आणि अल्पसंख्याक समूहांच्या सदस्यांचा समान हक्क सुनिश्चित करेल.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये अफगाणिस्ताना महिलांसाठी विद्यापीठीय शिक्षणावर बंदी घालण्याच्या तालिबनच्या निर्णयावर टीका करणाऱ्या अनेक प्रमुख देशांमध्ये भारताचाही समावेश होता.  तर, निवेदनात असेही म्हटले आहे की या बैठकीत अधिकार्‍यांनी दहशतवाद  आणि अंमली पदार्थांची तस्करी या क्षेत्रीय धोक्यांवरही चर्चा केली. याशिवाय या धोक्यांचा सामना करण्यासाठी समन्वित प्रयत्नांच्या शक्यतांवर विचार केला.

India announces supply of 20000 MTs of wheat assistance to Afghanistan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात