वैष्णवी ढेरे
भारतामध्ये इन जनरल सौंदर्याची व्याख्या म्हणजे गोरेपणा आणि सडपातळ असणे हिच आहे. भारतातच कशाला पण इतर काही देशांमध्ये देखील असाच विचार केला जातो. पण सध्याच भारतीयांचे स्वतःकडे बघण्याचा अंगल्स बदलणारी गोष्ट घडली आहे. ती म्हणजे नुकतीच 50 आकर्षक दिसणाऱ्या देशाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोर मोई या प्रसिद्ध स्विम वेअर ब्रॅण्डने हा स्टडी केला आहे. या अहवालानुसार जपान चौथ्या स्थानावर तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे. Not brown beauty but Indian beauty!
इंग्लंड स्थित द न्यूज नुसार, सर्वात आकर्षक व्यक्तिमत्वे निवडण्यासाठी सोशल मीडिया न्यूज एग्रीकेटर प्लॅटफॉर्म Reddit वर दिसणाऱ्या पोस्टचे विश्लेषण करण्यात आले. ज्यामध्ये विविध देशातील लोक होते. या पोस्टवरील कमेंटमध्ये येणारे आकर्षक,सुंदर, देखण्या, भव्य, गुड, हॉट आणि सेक्सी अशा शब्दांच्या आधारे त्यांचा स्कोर तयार करण्यात आला. याशिवाय त्यांना मिळालेल्या अपव्होट्सचाही एक भाग बनवण्यात आला. आणि मग AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन मानांकन करण्यात आले.
आपल्याकडील जुन्या मंदिरांवरील शिल्प, लेण्यांमधील शिल्प, मूर्ती या बघितल्या तर त्या नेहमीच curvy आणि chubby शरीर ठेवणीच्या असतात. कारण भारतीयांचा रंग आणि भारतीयांची शरीराची ठेवण ही मुळातच curvy आहे.आणि तीच भारतीयांना आकर्षक बनवते. पण मध्यंतरी झिरो फिगर हा ट्रेंड आल्यामुळे., जिम, डायट, प्रोटीन इंटके करून वजन कमी करणे हे सुरू आहे. पण सायकोलॉजिकली थिंकिंगनुसार जी गोष्ट curvy असते, ती जास्त अट्रॅक्टिव दिसते. ही गोष्ट इतर देशातल्या लोकांना कळते. पण भारतीयांना उमगत नाही. त्यामुळे सौंदर्याच्या कन्सेप्ट मध्ये गोर दिसणं आणि सडपातळ असणं हेच बसतं.
या एका प्लॅटफॉर्ममुळे कदाचित आपल्याच लोकांचे आपल्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलणार आहे असे वाटते. भारतीयांमध्ये मोस्ट प्रोबॅब्ली डार्क स्किन टोन आढळून येतो. त्यामुळे त्यांना ब्राऊन ब्युटी असे देखील म्हटले जाते. “पण आता ब्राऊन हा शब्द मँडेटरी न राहता ब्युटी हाच शब्द फक्त वापरला जाणार आहे.” आपणच स्वतःकडे बघताना, समाजात वावरताना, स्वतःला एका चौकटीत बांधून घेतो आणि त्या चौकटीनुसार सौंदर्य हे रंगानुसार ठरते, असे भारतीयांमध्ये खूप प्रचलित आहे. पण हीच डेफिनेशन कदाचित या एका प्लॅटफॉर्ममुळे बदलणार आहे, असे वाटते. आणि भारतीय रंग व ढंग असलेल्या व्यक्तींचा स्वतःकडे बघण्याचा, स्वतःला प्रेझेंट करण्याचा कॉन्फिडन्स वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App