उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी केंद्राकडून नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी

Summer new

देशभरातली अनेक भागांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच तापमानात वाढ झाल्याचे समोर आले होते

विशेष प्रतिनिधी 

फेब्रुवारी संपून आता मार्च महिन्याची सुरूवात झाली आहे. बरोबरच उन्हाळ्याचे चटकेही सुरू झाले आहे. अशावेळी आपल्या उन्हापासून बचाव करत आपल्या प्रकृतीची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशांच्या अनेक भागांमध्ये तर फेब्रुवारीमध्येच तापमान वाढलेले होते. याचा अर्थ आगामी महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आऱोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेपासून कसा बचाव करावा यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या अगोदर हवामान विभागानेही अशाप्रकारची मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. Center issues guidelines to citizens to avoid heat wave

हायड्रेशनवर लक्ष द्यावे –

केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेत हायड्रेशनवर विशेष लक्ष देण्याबाबत सांगण्यात आले आहे. जर कुठे बाहेर जात असाल तर सदैव आपल्याबरोबर पाणी ठेवावे, जेणेकरून डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. सांगण्यात आले आहे की, लिंबू पाणी, छाछ, लस्सी, फळांचा रस(ज्यूस), ओआरएसचे पाण्याचे सेवन करत रहावे. याशिवाय टरबूज, काकडी, संत्री, मोसंबी आदी फळांचेही सेवन करावे.

याशिवाय जेवढं शक्य असेल तेवढं घऱातच थांबण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सावलीच्या ठिकाणी थांबणे, घराच्या खिडक्यांना पडदे किंवा शेडचा उपयोग करावा. पंखे, कुलर किंवा एसीचा वापर करून घरातील वातावरण थंड ठेवावे. वारंवार हातपाय धुवावेत शक्य झाल्यास आंघोळ करावी.

याचबरोबर घराबाहेर निघताना टोपी, छत्री, रुमाल, स्कार्फ इत्यादींनी आपलं डोकं आणि चेहरा झाकावा. सैल सूती कपडे परिधान करावे.

दुपारी घराबाहेर पडणे टाळा –

वाढते तापमान पाहता उन्हापासून स्वत:चा  बचाव करण्यासाठी शक्यतो दुपारी १२ ते ३ या काळात घराबाहेर पडणे टाळावे. कारण या काळात तापमान प्रचंड़ वाढलेले असते. याशिवाय दारू, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स पिण्यासही मनाई करण्यात आली आहे.

केंद्राच्या सूचनेत त्या आजारांचाही उल्लेख करण्यात आला आहे, जे आजार झालेल्या व्यक्तींना उष्णतेच्या लाटेपासून धोका उद्भवू शकतो. याशिवाय हृदयाशी संबंधित आजाराचे रूग्ण, गर्भवती महिला, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक, लहान मुले, नवजात बालक यांनाही उष्णतेच्या लाटेपासून बचाव करावा लागणार आहे.

Center issues guidelines to citizens to avoid heat wave

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात